काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनिंग चा चोवीस पिशव्या तांदूळ जप्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 2, 2023

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनिंग चा चोवीस पिशव्या तांदूळ जप्त..

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनिंग चा चोवीस पिशव्या तांदूळ जप्त..
बारामती:- काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या प्रत्येकी 50 किलो तांदळाच्या 24 बोऱ्या घेऊन जाणारा अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एम हेच 42 बीएफ 1307 जात असताना सपोनी संकपाळ पोलीस हवालदार काळे पोलीस हवालदार ससाने पोलीस हवालदार खांडेकर,पोलीस नाईक कोळेकर यांना नाकाबंदी दरम्यान मिळाला. सदर टेम्पो चालक गणेश मारुती दळवी राहणार डोरलेवाडी याने सदरचा तांदूळ त्याने खरेदी केला आहे असे सांगितले कारण त्या तांदळाला खाजगी साध्या गोण्या होत्या. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला गव्हर्मेंट रेशनिंग चे पॅकिंग नाही असे सांगितले. त्यानंतर बारामती भागामध्ये तांदूळ कुठेही पिकत नाही त्यामुळे कोणताही शेतकरी मार्केट कमिटी मध्ये तांदूळ आणण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून त्याला कोणत्या शेतकऱ्याकडून किंवा मार्केट कमिटी कडून तांदूळ खरेदी केल्याच्या पावत्या आणून देण्यास सांगितले असता. तो पावत्या घेऊन येतो असे सांगितले परंतु त्यांनी पावत्या हजार न केल्याने पोलिसांनी सदरचा तांदूळ हा रेशनिंग चा असल्याच्या संशयावरून अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे करत आहेत.

No comments:

Post a Comment