धक्कादायक घटना..१६ वर्षीय प्रेयसीवर चाकूचे ४० वार करून संपवले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 30, 2023

धक्कादायक घटना..१६ वर्षीय प्रेयसीवर चाकूचे ४० वार करून संपवले..

धक्कादायक घटना..१६ वर्षीय प्रेयसीवर चाकूचे ४० वार करून संपवले..
दिल्ली:- एका माथेफिरू प्रियकराने चाकू आणि दगडाने ठेचून १६ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली,हत्येच्या घटनेने राजधानी दिल्ली हादरली आहे.ही संपूर्ण घटना एका रस्त्यावर घडली आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्याने संपूर्ण घटनाक्रम घडवून आणला आहे.दिल्लीतील उत्तर जिल्ह्यातील शाहबाद पोलिस ठाण्याच्या
परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीचे नाव साहिल असल्याची ओळख पटली आहे. हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेच्या दिवशीच दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून साहिलला अटक केली आहे.पोलिसांनी साहिलची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. साहिलने पोलिसांना सांगितले की, ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्याला आता कुठलाही पश्चाताप नाही. साहिल म्हणाला की, मुलगी अनेक दिवस माझ्याकडे दुर्लक्ष करत होती, तिला माझ्यासोबतचे नाते संपवून तिच्या जुन्या प्रियकराकडे जायचे होते, यावरून खूप राग आला आणि तरुणीची हत्या केली, असे साहिलने म्हटले आहे. हत्येनंतर साहिल रिठाळा येथे गेला आणि तेथे साहिलने खुनात  वापरलेला चाकू लपवून ठेवला. यानंतर साहिल बुलंदशहरला
गेला. बुलंदशहरला जाण्यासाठी त्यांनी दोनदा बस बदलली.अखेर पोलिसांनी त्याला पकडले आहे.

No comments:

Post a Comment