"सोबत आली नाहीस तर पळवून नेईन!' धमकी देत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

"सोबत आली नाहीस तर पळवून नेईन!' धमकी देत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

"सोबत आली नाहीस तर पळवून नेईन!' धमकी देत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग!
पुणे :- प्रेमाच्या जाळ्यात फसून तर कुणी जबरदस्तीने मुलींना फळवून नेण्याचे प्रमाणात वाढ होत आहे, नुकसान 'माझ्यासोबत आली नाहीस तर पळवून घेऊन जाईन,'  अशी अल्पवयीन मुलीला धमकी देणाऱ्या शाहीद शेखला पोलीसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी
मुलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेसेज पाठवित होता.वारंवार पाठलाग करुन पळवून नेण्याची धमकी देत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी शाहीद अन्वर शेख (२१, रा. जाधव वस्ती, भारत फोर्ज कंपनीजवळ, घोरपडी) याला अटक केली आहे. हा सर्व प्रकार १३ मे २०२३ ते २७ मे २०२३ या कालावधीदरम्यान घडला.
याप्रकरणी १६ वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे.पोलिसांनी शाहीद शेख याच्याविरुद्ध भादवि ३५४, ३५४ड,५०४, ५०६, पोक्सो कलम ११, १२अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी कात्रज परिसरात राहण्यास आहे. तर, आरोपी हा
तिथून तब्बल १५ किलोमीटर लांब राहण्यास आहे.आरोपी शेख याने या मुलीला तिचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेसेज केले. तसेच, ही मुलगी तिच्या एमएच सीआयटीच्या
क्लासला जात असताना तिचा गाडीवरुन पाठलाग केला.तिला तु माझ्याबरोबर आली नाही तर तुला दोन वर्षाने परत तुझे वय पूर्ण झाल्यानंतर पळवून घेऊन जाईन. जरी
तुझ्या घरच्यांनी तुझे लग्न दुसरीकडे करुन दिले तरी तुला पळवून घेऊन जाईल अशी धमकी दिली. तिचा हात राहाने ओढून मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर २९ मे रोजी ही मुलगी तिच्या आईवडिलांसह जात असताना तिच्याकडे पाहून हाताने तु छान दिसतेस अशा
खाणाखुणा आणि अश्लिल इशारे केले. तसेच स्वत:च्या कानाला हात लावून फोन करण्याचा आणि फोन नाही केला तर मारण्याचा इशारा केला. ही माहिती तिने कुटुंबियांना दिली. त्यानंतर आईवडिलांनी पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

No comments:

Post a Comment