बारामती शहर पोलीस ठाण्याचे तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 2, 2023

बारामती शहर पोलीस ठाण्याचे तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त.
बारामती:- दिनांक 31 मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी नेमणुकीस असलेले भाऊसाहेब पलंगे, अरुण रासकर, अशोक वनवे हे अनुभवी तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 33 वर्ष सेवा करून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले आहेत. सचोटी शिस्तप्रियता कार्यतत्परता आज्ञाधारकपणा खेळाडू वृत्ती या गुणांमुळे त्यांनी संवेदनशील पुणे ग्रामीण जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये निष्कलंक 33 वर्षे सेवा बजावलेली आहे. तिघांचेही कुटुंबीय उच्चशिक्षित व स्थिरस्थावर झालेले आहेत. या तिघांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ काल बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आयोजित केला होता त्यावेळी या तिघांच्याही कुटुंबीयांचा सत्कार संपूर्ण पोशाख गुच्छ श्रीफळ शाल देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला परीक्षा दिन पोलीस उपाधीक्षक वाणी मॅडम तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ज्या खात्यामध्ये सतत रात्रंदिवस तेतीस वर्षे सेवा केली तेथून निवृत्त होताना हे तिघेही कर्मचारी भावनिक झालेले दिसून आले.

No comments:

Post a Comment