75 टन साखर मागवूनही;साखर पाठवली नाही तसेच बिलापोटी दिलेली एकूण 25,34,000/- रुपये ही परत केले नसल्याने गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 31, 2023

75 टन साखर मागवूनही;साखर पाठवली नाही तसेच बिलापोटी दिलेली एकूण 25,34,000/- रुपये ही परत केले नसल्याने गुन्हा दाखल...

75 टन साखर मागवूनही;साखर पाठवली नाही तसेच बिलापोटी दिलेली एकूण 25,34,000/- रुपये ही परत केले नसल्याने गुन्हा दाखल....     बारामती:-बारामती शहर पोलिस स्टेशन गु.र.नं. 649/2023 भा.दं.वि.क.420,406 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून याबाबत मनसुकलाल गोकुळदास गुंदेचा  व्यवसाय — पुनव कार्पोरेशन बारामती होलसेल साखर विक्री रा. सातव चौक तांदूळवाडी रोड बारामती ता.बारामती जि.पुणे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून इसम नामे हरी किशन सिंग रा.101 कैलाना खास ता. गोहना सोनीपत राज्य—  हरियाणा यानी दि. 17/09/2021 व  दि.18/09/2021 रोजी रोजी पासून आज अखेर पर्यंत केलेल्या गुन्ह्याची तक्रार दि. 31/08/2023 रोजी 21/17 वाजता दाखल झाली असून यातील आरोपी याने फिर्यादीस साखरेचा एक ट्रक पाठवून फिर्यादीचा व पूनव कार्पोरेशन या फॉर्मचा विश्वास संपादन करून फिर्यादीने पुन्हा 75 टन साखरेची मागणी केली असता आरोपी याने एक लाख रुपये डिपॉझिट व 23,25,000/— रुपये साखरेची किंमत अशी मागणी केली. त्यानुसार फिर्यादीने आरोपीस आर.टी.जी.एस ने पाठवले होते. परंतु आरोपी याने फिर्यादीस साखर पाठवली नाही तसेच बिलापोटी दिलेली एकूण 25,34,000/— रुपये परत केले नाही. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजि. दाखल  असून तो दाखल अंमलदार- सहाय्यक फौजदार काळे यांनी करून घेत तपासी अधिकारी —  पोसई पाटील करीत असल्याचे माहिती प्रभारी अधिकारी - पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment