धक्कादायक..200 कोटीसाठी 1 कोटी 13 लाख गमावले,चार जणांनी मिळून फसवणूक केली एका व्यक्तीची.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 1, 2023

धक्कादायक..200 कोटीसाठी 1 कोटी 13 लाख गमावले,चार जणांनी मिळून फसवणूक केली एका व्यक्तीची....

धक्कादायक..200 कोटीसाठी 1 कोटी 13 लाख  गमावले,चार जणांनी मिळून फसवणूक केली एका व्यक्तीची....
बारामती:- बारामतीत चार जणांनी मिळून एका व्यक्तीची तब्बल 200 कोटीच्या अमिषाने 1 कोटी 13 लाखांची फसवणूक करून आरोपी पैसे घेऊन पसार  झाला असून 250 वर्षांपूर्वीच्या जुन्या काशाच्या भांड्याच्या विक्रीतून
200 कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत चौघांनी एकाची 1 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.250 वर्ष जुन्या काशाच्या भांड्याची विक्री करुन 200 कोटी रुपये मिळवून देतो, असं सांगत चार लबाडांनी मिळून एकाची तब्बल 1 कोटी 13 लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी रफिक इस्माईल तांबोळी (रा. लोहगाव), सिराज शेख उर्फ पानसरे (रा. कोंढवा), उमेश उमापुरे (रा. कासारशिरसी,
जि. लातूर) आणि धनाजी पाटील (रा. सांगली) या चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. राजेंद्र शेलार (रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.फिर्यादी राजेंद्र शेलार यांची 2014 ते 2016 दरम्यान आरोपी रफिक तांबोळी
याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना त्याचा आळंदी येथे लिटिगेशनचा प्लॉट असून तो क्लिअर करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचं सांगितलं होतं. प्लॉटची विक्रीतून 50 कोटी रुपये मिळणार असून, त्यातील 4 कोटी रुपये तुम्हाला देतो, असं त्यानं शेलार यांना सांगितलं. त्यामुळे शेलार यांनी त्याला 1
लाख रुपये रोख दिले.15 दिवसानंतर
तांबोळी याने शेलार यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी शेलारी यांनी त्याला 2 लाख रुपयांची मदत केली. त्यानंतर आरोपी वारंवार पैशांची मागणी करत गेला. शेलार यांनी आधी त्याच्या खात्यात 4 लाख 65 हजार रुपये, त्यानंतर आरोपी रफिक तांबोळी आणि त्याची पत्नी आतिया या दोघांच्या खात्यात 12 ते 17 लाख रुपये टाकले. 2017 मध्ये शेलार यांनी तांबोळीकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने
माझ्याकडे काशाचे भांडे असून ते 250 वर्षांपूर्वीचे आहे.त्या भांड्यात वीज पडून इलेक्ट्रीक पॉवर तयार होते. हे भांडे नासा, इस्रोसारख्या संस्था विकत घेतात. त्याच
किंमत 200 ते 300 कोटी रुपयांची आहे, असं
सांगितलं. परंतु या भांड्यात किती पॉवर निर्माण झाली आहे याची पडताळणी करण्यासाठी मला फी भरावी लागेल. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही मला मदत करा, असं म्हणत शेलार यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. त्याला भुलून शेलार यांनी त्यांची 90 गुंठे जमीन विकून तांबोळीला 90 लाख रुपये दिले.त्यानंतर तो मोबाईल बंद करून पसार झाला. यानंतर शेलार आर्थिक अडचणीत आले. रफिक तांबोळी याचा शोध घेताना त्यांची भेट शेख व उमापुरे यांच्याशी झाली. शेलार यांच्या अडचणीचा फायदा घेत या दोघांनीही काशाच्या भांड्याची कल्पना पुन्हा त्यांच्या डोक्यात उतरवली. त्यानंतर त्यांनी पुन्हा जमीन गहाण ठेवत 18 लाख रुपये या दोघांना दिले. धनाजी पाटील याने सुद्धा अशाच पद्धतीने अमिष दाखवत शेलार यांच्याकडून 3 लाख 80 हजार रुपये उकळले. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment