बारामती शहरात जालन्याहून घरफोडया, मोटार सायकल,चारचाकी कार,चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरटयांना बारामती शहर पोलीसांकडून अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 25, 2023

बारामती शहरात जालन्याहून घरफोडया, मोटार सायकल,चारचाकी कार,चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरटयांना बारामती शहर पोलीसांकडून अटक..

बारामती शहरात जालन्याहून घरफोडया, मोटार सायकल,चारचाकी कार,चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरटयांना बारामती शहर पोलीसांकडून अटक..
बारामती:- दिनांक २४.०८.२०२३ रोजी सायंकाळी बारामती शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व गुन्हे शोध पथकाची संपुर्ण टीम हे वारामती शहरात चो-या, दरोडे, घरफोडया होवून नयेत म्हणुन संपुर्ण शहरात गस्त करून संशयीतांना चेक करीत असताना त्यांना चिमन शेख मळा येथे दोन संशयीत पाठीला बॅग
लावून संशयास्पद रित्या फिरत असताना दिसून आल्याने पोलीसांनी अगदी सावध पणे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून त्यांचे चौकशी केली असता त्यांचेकडे मोटार सायकल चोरी करण्यासाठी मास्टर चाव्या, तसेच चारचाकी चोरण्यासाठीचे कटर, घरफोडी करण्यासाठी घराचे लॉक तोडण्यासाठी कटावणी,बॅटरी,चाकू सु-या स्कुरू ड्रायव्हर, पकडी असा संपुर्ण चो-या करण्याचे साहित्य मिळून आले असून त्या आरोपींचे नावे संजय सिंग कृष्णासिंग भादा व गोपीचंद प्रल्हादसिंग टाक दोन्ही राहणार जालना अशी असून त्यांना पोलीसांनी अटक केलेली आहे
पोलीस कोठडी रिमांड घेतलेले असुन त्या आरोपींचे विरूद्ध वीड, गेवराई तसेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी सारखे गंभीर सहा गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. वारामती मध्ये घडलेल्या चो-यांचे वावत पोलीस त्यांचेकडे अधिक तपास करीत आहेत.
सदर कार्यवाही मध्ये मा श्री अंकित गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा श्री आनंद भोईटे ,अपर पोलीस अधिक्षक वारामती, मा. श्री गणेश इंगळे  उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व बारामती शहर पोहेकॉ रामचंद्र शिंदे, पोहेकॉ अभिजीत कांबळे, पो कॉ अक्षय सितप, पोकॉ सागर जामदार, पोकॉ शाहु राणे, पोकॉ दादा जाधव, पोकॉ दशरथ इंगवले बारामती शहर डि बी पथकातील कर्मचारी स्टाफ यांनी सदरची चांगली कामगिरी केलेली आहे.

No comments:

Post a Comment