सर्वसामान्य कार्यकर्त्याला नाही येथे वाव.!पांढरेपेशे,धनदांडगे व चमकोगिरी करणाऱ्याला आहे भाव..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 25, 2023

सर्वसामान्य कार्यकर्त्याला नाही येथे वाव.!पांढरेपेशे,धनदांडगे व चमकोगिरी करणाऱ्याला आहे भाव..!!

सर्वसामान्य कार्यकर्त्याला नाही येथे वाव.!पांढरेपेशे,धनदांडगे व चमकोगिरी करणाऱ्याला आहे भाव..!!                   बारामती:-बारामती म्हंटली की महाराष्ट्रातच नव्हे तर देशात चर्चेत असणारे 'बारामती' हे नाव या गावात विकासाच्या दृष्टीने नावाजले गेलेले गाव याच गावातील एका पक्षावर नितांत प्रेम करणारी सर्व सामान्य कार्यकर्ते यांची हल्लीच्या गचाळ राजकारणात बळी जात असल्याची खंत अनेकांनी जाहीरपणे बोलून दाखविली नक्की झेंडा कोणता हातात घ्यायचा,कोणाच्या पाठीमागे ठाम राहायचे याचे कोड कार्यकर्त्यांना उलघडेना अजूनही समर्भात असणारी कार्यकर्ते आज प्रतिक्रिया देताना आपल्या मनातील भावना व खंत व्यक्त करताना दिसतात,पक्षावर व नेत्यावर आमचा विश्वास आहे पण घडत असलेले राजकीय वातावरण काय सांगत आहे याला कानाडोळा करून चालणार नाही,नुकताच होत असलेल्या एका कार्यक्रमासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी नियोजन करण्यासाठी आवाहन केलं पण ते पांढरपेशी,गब्बरदंड पुढारी यांना, तर सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र  यापासून लांबच राहिला मतदाना वेळी या तळागाळातील कार्यकर्त्यांचा वापर होतो पण मिटिंग,नियोजन, व्यक्तिगत विकास यापासून मात्र वंचित राहतो आणि गर्दी करण्यासाठी आठवण होते हे वारंवार घडत असल्याचे चित्र सद्या पाहायला मिळत आहे, मुळातच पक्ष हा गोरगरिबांचा नसून धनदांडग्यांचा आहे की काय अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असल्याचे चौकाचौकात ऐकावयास येत आहे, एकनिष्ठतेने काम करूनही पक्षात महत्व नसल्याचेही खंत व्यक्त होताना दिसली,पूर्वी विचारणा व्हायची मात्र आत्ता भेदभाव केला जातो हा दुजाभाव का होऊ लागला आहे,चमकोगिरी करणारे मात्र पुढे असतात व निष्ठावंत मागे असतो त्याचा भावनांचा आदर केला जावा नेत्याने कानापाशी कोण व तळागाळातील सर्वसामान्य जो पक्ष वाढीसाठी खरा काम करणारा कोण हे ओळखलं पाहिजे,जोपर्यंत बदल होत नाही दुजाभाव संपणार नाही तोपर्यंत  सच्चा कार्यकर्ता पक्षातून निघून गेलेला असेल अश्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

No comments:

Post a Comment