बंद पडलेली डाक जीवन विमा विलंब शुल्क न देता ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा सुरु करता
पुणे:-भारतीय टपाल विभागाने डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा पॉलीसी धारकासाठी उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकाची डाक जीवन विमा पॉलीसी कोणत्याही कारणास्तव बंद होण्याच्या मार्गावर आहे, त्यांना ती पुनरुज्जीवन करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये पॉलीसी धारकाला
कुठलाही विलंब शुल्क देण्याची आवशकता नाही. निदेशालय, डाक जीवन विमा, नवी दिल्ली, यांचे पत्र क्रमांक 26-02/2022-LI दि. 05.09.2023 अनुसार अधिसूचना जारी केली आहे.कोरोना महामारीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तसेच आर्थिक संकटामुळे ग्राहकांना
त्यांचा डाक जीवन विमा सुरु ठेवता आला नाही तसेच तीन-चार हप्ते भरल्यानंतर ग्राहक आर्थिक अडचणींमुळे विमा पुढे चालू ठेवू शकले नाही म्हणून केंद्र सरकारच्या या सुविधेमुळे ग्राहकांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याहीविलंब शुल्क न देता ती पुन्हा सुरू करता येणार आहे असे श्री. बाळकृष्ण एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण
विभाग पुणे यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment