धक्कादायक..संस्थेच्या जमिनीची परस्पर विक्री करून सव्वा दोन कोटींची फसवणूक,8 जणांवर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 14, 2023

धक्कादायक..संस्थेच्या जमिनीची परस्पर विक्री करून सव्वा दोन कोटींची फसवणूक,8 जणांवर गुन्हा दाखल..

धक्कादायक..संस्थेच्या जमिनीची परस्पर विक्री करून सव्वा दोन कोटींची फसवणूक,8 जणांवर गुन्हा दाखल..
 पुणे:-जमिनीची विक्री करताना रद्द न होणारे कुल मुखत्यारपत्र तयार करुन जमीनीचे खरेदी खत करुन दिले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सहकारी गृहरचना संस्थेची 140 गुंठे जमिनीची परस्पर विक्री करुन संस्थेची 2 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जमीन खरेदी करणाऱ्यासह संस्थेच्या 7 जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकार 2018 मध्ये घडला आहे. याबाबत प्रमोद सिताराम बेंगस्ट्रा (वय - 61 रा. भवानी पेठ, पालखी चौक,पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर
भागवत शेलार, विवेक परदेशी,राजकुमार शिलेदार, श्रीकांत फुलपगार,नंदकुमार नागवडे, तानाजी कुंभार,तानाजी कटक, लक्ष्मण जगदाडे यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या शिवसागर सहकारी
गृहरचना संस्था मर्या. यामध्ये आरोपी हे प्रवर्तक
आहेत. आरोपींनी संगणमत करुन संस्थेची 140 गुंठा जमीन ही कोणत्याही सभासदांना विश्वासात न घेता तसेच पूर्व सूचना न देता, ठराव पास न करता 2018 मध्ये लक्ष्मण जगदाडे याला विक्री केली. आरोपींनी जमिनीची विक्री करताना रद्द न होणारे कुल मुखत्यारपत्र तयार करुन जमीनीचे
खरेदी खत करुन दिले.आरोपींनी या व्यवहारातून आलेली 2 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम
संस्थेच्या बँक खात्यात जमा न करता स्वत: खात्यात जमा करुन संस्थेची फसवणूक  केली. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत
आहेत.

No comments:

Post a Comment