धक्कादायक..मुलगी झाली म्हणून आश्रमात केलं दाखल पण आश्रम नसल्याचा आला संशय.. पोलिसांनी 14 महिन्यांपूर्वी आश्रमात दिलेलं बाळ दिलं परत मिळवून... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 15, 2023

धक्कादायक..मुलगी झाली म्हणून आश्रमात केलं दाखल पण आश्रम नसल्याचा आला संशय.. पोलिसांनी 14 महिन्यांपूर्वी आश्रमात दिलेलं बाळ दिलं परत मिळवून...

धक्कादायक..मुलगी झाली म्हणून आश्रमात केलं दाखल पण आश्रम नसल्याचा आला संशय.. पोलिसांनी 14 महिन्यांपूर्वी आश्रमात दिलेलं बाळ दिलं परत मिळवून...  
बारामती:- *मुलगी म्हणून जन्माला येणं हा काय तिचा गुन्हा, सांभाळू शकत नाही म्हणून आश्रमात टाकावं* सत्य घटनेवर आधारीत धक्कादायक घटना नुकताच घडली याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.. बारामती तालुक्यातील एका गावातील एका महिलेने पुणे येथील दोघांनी माझ्या गरीबी व अडाणीपणाचा फायदा घेवुन
मला फुस लावुन माझी लहान मुलगी वय वर्षे एक हिला तृतीयपंथी हिच्या ताब्यात दिले असलेबाबत लेखी तक्रारी अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दि.13/9/2023 देण्यात आला या गंभीर अर्जाची तात्काळ दखल घेत त्यापद्धतीने चौकशीचे आदेश देण्यात आले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महिला ही बारामती च्या जवळ असणाऱ्या गावात राहण्यास असून तिचे पती यांचे दहा वर्षा पुर्वी निधन झाले आहे. त्यांच्या पासुन त्यांना तीन मुली आहेत. माझी परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांना मुर्टी मुढवे येथील आश्रम शाळेत शिकण्यास ठेवले
आहे. सन २०१९ साली एका इसमाशी माझी ओळख झाली तेव्हा त्याने मला लग्नाची मागणी केली. तेव्हा आम्ही दोघांनी जेजुरी येथे जावुन खंडोबाला साक्षी मानुन लग्न केले. त्याच्यापासुन मला दिवस गेले व  मुलगी झाली. मुलगी झाली म्हणुन त्याला तिचा खुप राग आला. म्हणुन त्याने मुलीला बापाचे नाव लावणेस नकार दिला. त्याने
 १० वर्षापुर्वी मेलेल्या पतीचे नाव मुलीस लावले. त्यानंतर त्याला मुलाची हौस असल्याने त्याने दुसरे लग्न केले.तो सोडुन गेल्याने माझी हलाखीची व गरीबीची परिस्थिती निर्माण
झाली. माझी मुलगी दोन महिन्याची असताना एक महिला तांदुळवाडी येथे भेटली व म्हणाली की, “तु खुप गरीब आहेस, तु असले अवस्थेमध्ये
मुलीचा संभाळ करू शकणार नाही, जसे तु तुझ्या तीन मुलींना आश्रम शाळेत टाकले आहे, तसेच या लहान बाळाला सुध्दा आपण आश्रममध्ये टाकु” मग तीने मला तिची मैत्रीण हिच्याकडे नेले. ती मैत्रीण म्हणाली की, “पुणे येथे माझ्या एका मैत्रणीचे आश्रम आहे, तेथे तुझ्या बाळाला ठेवु, ते तीचा खुप चांगला सांभाळ करतील, तीची काळजी घेतील, तु एक दोन महिन्याला भेटायला जात जा” असे खुप गोड गोड बोलुन विश्वास
दिला .मग दोघीच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला.या दोघींनी मला रेल्वे मध्ये बसवुन पुण्याला नेले. तेथे त्यांनी मला दगडुशेठ
हलवाई गणपती मंदीराच्या पुढे एका छोटयाशा ऑफीस मध्ये नेले. तेव्हा त्या ऑफीस मध्ये तृतीय पंथी इसम नामे (पुर्ण नाव माहित नाही) तिचे बाळ तीचे ताब्यात द्यायला लावले. त्यांनी माझे आधार कार्ड घेतले व त्या आधार कार्डावर सही घेतली व बाळ त्या दोघींनी तृतीयपंथी व्यक्तीच्या ताब्यात दिले.तेव्हा मी त्या दोघींना बोलले, हे काय आश्रम नाही,या अगोदर माझ्या पहिल्या
 तीन मुली आश्रमात शिकत आहेत, आश्रम कसे असते ते मी पाहिले आहे, तुम्ही मला गोड बोलुन कोठे आणले आहे" तेव्हा तृतीयपंथी व्यक्ती म्हणाला की, “आमचे आश्रमाचे काम चालू आहे, एवढया २-३ महिन्यात पुर्ण होणार आहे,
त्यावेळेस तुम्ही या, आश्रम आहे की नाही, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघुन जावा" असे बोलुन तिला या दोघींनी ऑफीसच्या बाहेर आणले व तेथुन त्यांनी तिला बारामती येथे आणले. नंतर मी एक महिन्यांनी पहिल्या महिलेला फोन केला, "आपण बाळाला जावुन भेटुया असे बोलले असता, तीने मला टाळाटाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर मी दुसऱ्या महिलेकडे गेली व तीला म्हणाले की, “तुझ्या मैत्रीणीला सांग की, माझ्या बाळाशी गाठ -भेट घालुन दे”तेव्हा तीने सुध्दा मला टाळाटाळ करणेस सुरवात केली. यातच ५-६ महिने निघुन गेले. त्यानंतर मी पहिल्या महिलेच्या घरी गेले. माझे बाळ कोठे आहे,तुम्ही कोणाच्या ताब्यात दिले आहे, असा जाब विचारला असता, तीने मला खुप मारले. मग माझी खात्री झाली की, या दोघींनी मला फसवले आहे. माझ्या आडणीपणाचा व गरीबीचा गैरफायदा घेत माझे बाळ तृतीयपंथी व्यक्तीच्या
ताब्यात दिले असुन बाळाची विक्री केली आहे असे मला वाटु लागले. मी खुप माझे बाळ मिळवणेसाठी धडपड केली. पण मी आडाणी असल्याने माझे कोठेही, काहीही चालले नाही, तसेच या दोघी मला सतत जिवंत मारण्याच्या
तसेच तुझे बाळ लंपास करू अशा धमक्या देत होत्या, म्हणुन मी आजपर्यंत पोलीस स्टेशन येथे गेलेले नव्हते. माझी आत्ता भिती संपलेने आज रोजी आपणाकडे लेखी तकार करीत आहे.
तरी आपणास नम्रतेची विनंती की,प्रस्तुत अर्जाची दखल घेवुन दोन महिला व तृतीयपंधी यांच्यावर गुन्हे दाखल करून माझे बाळ माझ्या ताब्यात द्यावे यासाठी लेखी पत्र दिले त्या अनुषंगाने 
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, बारामती शहर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व  ज्योती जाधव निर्भया पथक यांच्या कर्तव्यदक्ष पणामुळे आई पासून लांब गेलेले बाळ १४ महिन्यानंतर बाळाची आई यांना पुन्हा एकदा बाळ भेटले यासाठी बाळाच्या आई *** *** यांना कायदेशीर मदत ॲड. सुधीर पाटसकर,ॲड. सोमनाथ भाईजी पाटोळे,ॲड. अभिजित जगताप यांनी केली असल्याचे सांगण्यात आले सदर या घटनेची लेखी तक्रार अर्जाची दखल घेत संबंधित आश्रम शाळा चालविण्याऱ्या चालक व त्यामध्ये सहभागी असणाऱ्या महिला व तृतीयपंथी यांची कसून चौकशी करण्यात आली यादरम्यान आईनेच बाळ आमच्या आश्रमात आणून दिले असून त्याचा सांभाळ करावा असे सांगितले अशी माहिती सांगितली व आम्ही गेली अनेक वर्षांपासून सामाजिक सेवा भावी काम करून संस्था चालवीत असून लोकांकडून मदत घेऊन आश्रम चालवीत आलो असून पूर्वी14 लहान बाळ आम्ही सांभाळली होती पण नंतर आश्रम काही काळ बंद केल्याने बाळाच्या पालकांना परत त्यांची बालके दिली आहे असे सांगण्यात आले असल्याने पोलीस अधिकारी यांनी  त्यांची कागदपत्रे तपासणी करण्यात येईल व त्याची खातरजमा  करून योग्य कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकारी यांनी यावेळी सांगितले असून लवकरच याबाबत खुलासा होईलच पण असे बाळ संस्थेने आश्रम चालवून सांभाळता येतं का?त्याची कायदेशीर बाबी पडताळणी केली का?असे अनेक प्रश्न विचार करायला लावणारी आहेत कारण लहान बाळाची तस्करी होत असल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत व या बाळाचं पुढे काय केलं जातं ही एक चिंताजनक बाब आहे व तसा संशय आल्याशिवाय राहत नाही.    
 *टीप - या बातमीत महिलांची नावे उघड केली नाही कारण अद्याप गुन्हा दाखल नाही*

No comments:

Post a Comment