वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 29, 2023

वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा..

वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा 
वालचंदनगर : २८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये वालचंदनगर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सतीश फुलारे पोलीस नाईक यांनी केले, त्यानंतर मा. सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. व माहिती अधिकार कायदा लोकहितासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो यावर आपले मत व्यक्त केले. नंतर इंदापूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते वैभव धाईंजे यांना माहिती अधिकार कायद्याबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती मा. विक्रम साळुंखे यांनी  केली, त्यानंतर वैभव धाईंजे यांना कायदा स्थापन कसा झाला व हा कायदा स्थापन होण्यापूर्वीची परिस्थिती लोकांसमोर मांडली. माहितीचा अधिकार कायदा हा किती व्यापक आणि लोकांना त्यांचे हक्क कशाप्रकारे मिळवून देतो. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक मध्ये सांगितल्या प्रमाणे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम या नात्याने भारत देशातील सर्व नागरिकांना हा अधिकार आहे की तो कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयातून माहिती मागू शकतो. दरवर्षी लोकांमध्ये जनजागृती होऊन, हा कायदा सर्वसामान्यांना शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ज्या ज्या पद्धतीमध्ये कार्य चालते योजना काय आहेत. व जनतेच्या कल्याणासाठी शासनाकडून आलेले अनुदान, निधी कुठे व कसा खर्च झाला याची माहिती घेण्याचा अधिकार भारत देशातील सर्व नागरिकांना आहे. या कायद्याचा उपयोग लोकहितासाठी करण्यात यावा. असे मत इंदापूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते वैभव धाईंजे यांनी केले व कार्यक्रमात सहभागी सर्व नागरिकांचे आभार मा. सतिश फुलारे साहेबे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment