लोणावळा :- धक्कादायक घटना समोर आली असून यामध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडी
मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात खळबळ उडाली होती. ही घटना 25
सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणातील
संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या
केल्याचे शुक्रवारी (दि.29) उघडकीस आले
आहे. विजय शशिकांत मालपोटे असे आत्महत्या
करणाऱ्या इसमाचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी विजय मालपोटे याच्या विरोधात आयपीसी 376, 323, 506, पॉक्सो कायदा कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला होता.गुन्हा केल्यानंतर इसम फरार झाला होता.पोलीस त्याचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत नऊ वर्षाच्या
मुलीच्या आईने 27 सप्टेंबर रोजी लोणावळा
ग्रामीण पोलिसांकडे इसम नामे विजय मालपोटे
याच्या विरोधात फिर्याद दिली.इसमाने पीडीत
मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून
घेतले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार
केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर
पोलिसांकडून इसमाचा शोध सुरु करण्यात
आला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी परंदवाडी येथे संशयित इसम विजय मालपोटे हा टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे
डॉक्टरांनी सांगितले.या घटनेबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment