बारामतीत विकासाची दिशा चुकतेय का?जिथे गरज तिथे विलंब..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 12, 2023

बारामतीत विकासाची दिशा चुकतेय का?जिथे गरज तिथे विलंब..!

बारामतीत विकासाची दिशा चुकतेय का?जिथे गरज तिथे विलंब..!
बारामती(संतोष जाधव):-बारामती शहर विकसित होत आहे हे खरं असलं तरी शहरातील  उपनगरामध्ये काही भागात नव्याने होत असलेली विकसित कामे ही जाणून बुजून का थांबली हे कळले नसले तरी यामागे कोणाचा अडथळा निर्माण होत आहे हे समजणे गरचेचे असल्याचे स्थानिक नागरिक विचारीत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर कसबा येथील विठ्ठल प्लाझा ते जामदार रोड चे काम गेली अनेक महिने का रखडले हे समजू शकले नाही, मात्र या अर्धवट कामामुळे या भागातील स्थानिक रहिवाशी मात्र या रस्त्यामुळे पुरता हैराण झाला आहे लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तर अनेक लहान मुलं, महिला भगिनी तसेच वयोवृद्ध नागरिक रस्त्यावर टाकलेल्या खडी मुळे घसरून पडले आहेत तर लहान मुलं जखमी झाले आहे, तर येणाऱ्या जाणाऱ्या वाहना मुळे रस्त्यावरच्या उडणाऱ्या धुळीमुळे रहिवासी हैराण झाले आहे, म्हणे बारामती नगर परिषदेने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले असल्याचे कळतंय हे काम खऱ्या अर्थाने तात्काळ होणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही कारण नेहमीच चर्चेत वादात राहिलेला जामदार रोड याचा मागचा इतिहास काढला तर कळेल काही नागरिकांनी या रस्त्याचा विषय खूप मोठा केला होता अनेक दिवसाचे आंदोलने झालीत पुढे काही भाग डांबरीकरणही झाले आणि कालांतराने रस्त्याच्या मधीच ट्रक देखील रुतून बसला होता तर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते याचा किती त्रास भोगावा लागला हे या भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आजही विचारले तर सांगतील असो, आत्ता या घडीला विठ्ठल प्लाझा नजीक च्या रस्त्यावर काय अवस्था आहे प्रत्यक्ष दर्शी पहावयास गेल्यास दिसेल रस्ता इतका उचलून घेतला आहे की रस्त्याच्या कडेला असणारे व्यावसायिक दुकाने व घरामध्ये पावसाळ्यात पाणी गेल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती सद्या पहावयास मिळेल,या रस्त्याच्या कामाची परिस्थिती पाहिल्यास नक्की विकासाची दिशा बदलतेय की काय हे दिसून येईल.खऱ्या अर्थाने विकास हा नागरिक रहात असलेल्या भागातला तात्काळ होणे गरचेचे असताना तो न होता ज्या भागात नागरिक राहत नाहीत त्या भागात मात्र विकास जोमात चालू आहे हे पहावयास मिळत आहे, यानिमित्ताने उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजितदादा यांनी बारामतीचा विकास व्हावा म्हणून अतोनात प्रयत्न केले तसेच जर लोकवस्ती असणाऱ्या भागात तात्काळ केला तर जनता नाराज होणार नाही,भोगावे लागणारी यातना कमी होतील तरी अजितदादा यांनी यामध्ये लक्ष घालावे ही मागणी देखील स्थानिक रहिवाशी करीत आहे,तसेच या रस्त्याच्या कामासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन केलं जाईल असेही सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment