माढा लोकसभा अल्पसंख्याक मोर्चे संयोजक बैठकीचे प्रमुख आकर्षण-मुस्लिम समाजाचे जेष्ठ मा.रफीक भाई पठाण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 11, 2023

माढा लोकसभा अल्पसंख्याक मोर्चे संयोजक बैठकीचे प्रमुख आकर्षण-मुस्लिम समाजाचे जेष्ठ मा.रफीक भाई पठाण..

माढा लोकसभा अल्पसंख्याक मोर्चे संयोजक बैठकीचे प्रमुख आकर्षण-मुस्लिम समाजाचे जेष्ठ मा.रफीक भाई पठाण..
अकलूज(प्रतिनिधी):- दिनांक 11 /10 /2023 अकलूज येथे  सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस मां श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या संपर्क कार्यालय येथे  माढा लोकसभा अल्पसंख्यांक मोर्चा व माढा लोकसभा संयोजक व  सहसंयोजक व विधानसभा सहसंयोजक यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला धैर्यशील भैया मोहिते पाटील  यांच्या  नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यावेळी उपस्थित महाराष्ट्र भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव व पश्चिम  महाराष्ट्र संयोजक    
 मा .श्री अश्रफजी  वानकर व सोलापूर जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व माढा लोकसभा चे संयोजक श्री मुख्तार भाई कोरबू व माढा लोकसभा सहसंयोजक श्री रशीद भाई मुलांनी व 
फलटण विधानसभा चे संयोजक:- मां श्री अब्दुल सय्यद. 
माळशिरस  विधानसभा चे संयोजक:- मां श्री शाहिद शेख. 
करमाळा विधानसभा चे संयोजक:-मां श्री  हमीद मुलांनी.
 सांगोला विधानसभा चे संयोजक:-  मां श्री गुलाब भाई मुलांनी.
माढा विधानसभा चे संयोजक:- मां श्री वसिम शेख.
मान विधानसभा चे संयोजक:-  मां श्री आमीर मोहळकर.
त्यावेळी सर्व सहसंयोजक उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित मा. जमीर चौधरी,मा. अस्लम बाबा सय्यद,अमीन कोरबू, रफीक पठान ,अस्लम मुजावर अस्लम शेख, अस्लम पटेल ,  गुलाब मुलांनी, अतीक मुलांनी, अल्ताफ शेख, आतिक शेख,अमीन मुलांनी, रेहमान मुलांनी,तणवीर तांबोळी, शमीर शिखरगार, परवेज शेख, प्रशांत शहा , बाळु लोखंडे, वसीम मुलानी, राहुल भोसले, वशीम शेख,रशीद गुलाब शेख, सय्यद मुजावर , व त्या वेळी सर्व पदाधिकारी सहसंयोजक संयोजक उपस्थित होते. 
 या बैठकीमध्ये मा. आश्रफ जी वानकर साहेब यांच्या मार्गदर्शना नंतर मुस्लिम समाजाची ज्येष्ठ नेते माननीय रफिक भाई पठाण यांनी सर्व मुस्लिम समाजाचे विचार व्यक्त केले 1978 पासून कै. काकासाहेबांच्या काळापासून ते मा. आ. रणजीत सिंह मोहिते पाटील यांना व आणि येणाऱ्या भविष्यकाळात ही आम्ही मोहिते पाटील परिवाराशी एकनिष्ठ राहु. पण आमचं एक निवेदन आहे माढा लोकसभा मतदारसंघ हा मा.धैर्यशील मोहिते पाटील यांना देण्यात यावे. आम्ही गेले चार वर्षे सहन केले आता नाही सहन करणार,आम्हाला आमचा भूमिपुत्र खासदार म्हणून बघायचा आहे.

No comments:

Post a Comment