जमीन देतो म्हणून बारामतीत १३ लाखांना फसवल्याची तक्रार, गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 13, 2023

जमीन देतो म्हणून बारामतीत १३ लाखांना फसवल्याची तक्रार, गुन्हा दाखल..

जमीन देतो म्हणून बारामतीत १३ लाखांना
 फसवल्याची तक्रार, गुन्हा दाखल..
बारामती- बारामती मध्ये जमिनीचे भाव गगनाला मिळाले असल्याने खरेदी विक्री चे व्यवहार खूप वाढले असताना नुकताच एका व्यवहारात झालेल्या फसवणुकीची माहिती पुढे आली, बारामतीतील चिमणशहा मळा पाटस रोड
येथील इलेक्ट्रीक दुकान व्यवसायिकाला  
प्लॉट देतो म्हणून तांदूळवाडीतील एकाने
चक्क १२ लाख ९० हजारांना फसवले. या
प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तांदूळवाडी
येथील अमोल सुरेश येवले याच्याविरोधात
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अशोक बस्तीमल आस्वाल
यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी
वरील गुन्हा दाखल केला. हा फसवणूकीचा प्रकार ४ मे २०१२ पासून ते ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या काळात घडल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. यासंदर्भात शहर पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, ४ मे २०१२ ते ५ ऑक्टोबर
२०२३ या दरम्यान अमोल येवले याने
तांदूळवाडीतील गट क्रमांक 143/2 मधील
प्लॉट 4 व 5 यामधील प्रत्येकी १९३.८८
चौरस मीटर प्लॉट खरेदी करून देतो
म्हणुन १३ लाख ५० हजार रुपये नोटरीद्वारे
स्विकारले. त्यातील ६० हजार रुपये परत केले. मात्र १२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक
केली व पैसे मागितल्यानंतर मारण्याची
धमकी दिली अशी फिर्याद आस्वाल यांनी
दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक
फौजदार ए. जे. जगदाळे करीत आहेत.

No comments:

Post a Comment