मैत्रिणीला मेसज करु नको असे सांगितल्याचा राग आल्याने धारदार हत्याराने मारहाण..
पुणे :- राग भीक माग असतो तो कुठल्याही थराला जाऊ शकतो याचे अनेक उदाहरणे पाहिलीआहे, क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढतो आणि त्यामध्ये होत्याचं नव्हते होऊन बसते, यातून मारामारी, खून असे प्रकार घडतात असाच प्रकार मेसेज का करतो म्हणून घडला आणि मैत्री असणाऱ्या मित्रात वाद झाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 'तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो' असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने दोघांना धारदार हत्याराने मारहाण करुन जखमी केले.तसेच हवेत हत्यारे फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी चार जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली. हा प्रकार माळवाडी येथील बंदरुपया चौकात शुक्रवारी (दि. 10) रात्री अकराच्या सुमारास घडला.याबाबत अमोल राजाराम घाटे (वय-25 रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे. त्यानुसार अमर बसवराज जमादार (वय-19 रा. गोपाळपट्टी,मांजरी), अमन अशोक नरोटे(वय 19), श्रीपती संतोष सरोदे (वय 19) यांना अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींवर आयपीसी 307,
341, 324, 323, 504, 506, 427, 34, महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी आरोपी अमर जमादार याला त्यांच्या मैत्रिणीला मेसज करु नको असे सांगितले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता.शुक्रवारी रात्री अमोल घाटे हे त्यांचा मावस भाऊ सुदर्शन
याच्यासोबत दुचाकीवरुन बंदरुपया चौकातून जात होते.त्यावेळी आरोपींनी विठ्ठल मंदिराजवळ अमोल यांची गाडी आडवली. 'तु मोठा भाई झाला का, तु मला मेसेज करु नको म्हणतोस, तुझा गेमच करतो' अशी धमकी दिली.तसेच फिर्यादी व त्यांच्या मावस भावाला जीवे मारण्याचा उद्देशाने धारदार हत्याराने मारहाण केली.तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी फिर्यादी यांना वाचवण्यासाठी लोक आले असता त्यांनाही दमदाटी करुन फिर्यादी यांच्या गाडीची तोडफोड केली.त्यानंतर हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवली.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
No comments:
Post a Comment