खळबळजनक..पोलीस निरीक्षकावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल..
धुळे :-पोलीस अधिकारी यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आणि ज्यांचे शोषण झाले त्यांना संरक्षण
देण्याची जबाबदारी आहे, तोच रक्षक भक्षक झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हा सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी
त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. मागील काही दिवसांपासून त्यांचा एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार हेमंत पाटील यांच्यावर आयपीसी 354 अ, 354 ब, 354 ड, 509, 506, 34 तसेच आयटी अॅक्ट कलम 67, 67 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment