शरद पवार यांची बारामती नगरपरिषदेत छोटया व्यापाऱ्यांसोबत बैठक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 18, 2023

शरद पवार यांची बारामती नगरपरिषदेत छोटया व्यापाऱ्यांसोबत बैठक..

शरद पवार यांची बारामती नगरपरिषदेत छोटया व्यापाऱ्यांसोबत बैठक..
बारामती:-बारामती नगर परिषदेत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली यावेळी बारामती शहरातील जुनी मंडई येथील पूर्वी पासून छोटे व्यापारी आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आले,मंध्यतर कोरोनाचा काळ आला आणि होत्याचं नव्हतं झालं, त्यातून कशीतरी परिस्थिती सुधारत असताना काही दिवसांपूर्वी याठिकाणी असणारे छोटे छोटे दुकानदारांना नोटिसा देण्यात आली होती ऐन दिवाळीत या दुकानांवर बुलडोझर फिरणार होता पण तो थांबला पुन्हा यावर आत्ता बुलडोझर फिरणार असून याठिकाणी नव्याने मोठी इमारत उभी राहणार असून यामध्ये या छोट्या व्यापाऱ्यांना गाळे देणार असल्याचे कळतंय परंतु याबाबत सद्या तरी दुकाने पाडू नये अशी येथील


दुकानदारांनी शरद पवार यांना विनंती करून अजित पवार यांना किमान दोन वर्षे तरी ही दुकाने पाडू नये असा आग्रह केला असून आपण बोलावे असे सर्वांनी सांगितले यावेळी मुख्याधिकारी रोकडे यांनी दिड वर्षात इमारत उभी राहील असे सांगितले असता त्यांना नवीन मंडई ही दोन वर्षात होणार होती ती चार वर्षे लागले त्यामुळे व्यवसाय करताना कसरत होते असे अनेकांनी शरद पवार यांना सांगत आपण यातून मार्ग काढावा असे बोलल्याने शरद पवार यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना समजावत मी अजित पवार यांच्याशी बोलतो असे सांगितले.

No comments:

Post a Comment