जळोची मध्ये श्रीनाथ म्हसकोबा यात्रा उत्सवास प्रारंभ..
बारामती:- बारामती मधील जळोची येथील श्रीनाथ म्हसकोबा उत्सवास शनिवार दि.१८ नोव्हेंबर २०२३ रोजी भाविकांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात व आनंदाने प्रारंभ झाला.पहाटे सहा वाजता देवाला अभिषेक करण्यात आला तर सायंकाळी सहा वाजता देवाचा छबिना काढण्यात आला. "असे श्रद्धा ज्यांच्या उरी त्यास दिसे श्रीनाथ जोगेश्वरी" असे म्हणत जवळपास १ टन गुलालाची उधळण करीत,फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठ्या भक्ती भावाने भाविकांनी दर्शन घेऊन छबिना मिरवणूक मध्ये सहभागी झाले होते. पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हसकोबा मंदिर प्रसिद्ध आहे त्याच धर्तीवर जळोची मधील मंदिर व श्रीनाथ म्हसकोबा व माता जोगेशवरी यांची मूर्ती , मानाचा घोडा ,दिपस्तंभ हुबेहूब आकारला आहे. त्यामुळे दर्शनासाठी बारामती बरोबरच इंदापूर, दौंड,फलटण परिसरातील ,कर्जत ,व करमाळा परिसरातून भाविक येत असतात रविवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता देवाची कथा होणार आहे.तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसाद चा लाभ घेण्याचे आवाहन श्रीनाथ म्हसकोबा देवस्थान समितीने केले आहे.
No comments:
Post a Comment