*बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती;मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी खासदार सुळेंची मागणी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 23, 2023

*बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती;मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी खासदार सुळेंची मागणी*

*बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती;मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी खासदार सुळेंची मागणी*
बारामती(संतोष जाधव) : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. 

खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही त्यांनी टॅग केले आहे. 

दुष्काळी आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे. 

https://twitter.com/supriya_sule/status/1727547252187808111

No comments:

Post a Comment