बारामतीत कुणाच्या आशीर्वादाने चालुय अवैध दारू विक्री.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 23, 2023

बारामतीत कुणाच्या आशीर्वादाने चालुय अवैध दारू विक्री..

बारामतीत कुणाच्या आशीर्वादाने चालुय अवैध दारू विक्री..
बारामती:- बारामती शहर व तालुक्यातील काही गावात चालू आहे अवैध दारू विक्री यावर कारवाई होत नसल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली असून राजरोस पणे ही दारू विक्री केली जात असून शहरातील उपनगरात हातभट्टी, लिकर,देशी दारू विकली जात आहे, म्हणे या दारू विकणाऱ्यांना वरदहस्त असल्याने व हजारो रुपये हप्ता दिला जात असल्यानेच यावर कारवाई होत नाही असेही यावेळी बोलताना सांगण्यात आले, अनेकांचे कुटुंबातील महिला, मुलं व त्यांचे संसार उघड्यावर पडल्याने व घरातील कर्ता पुरुष या व्यसनापायी बळी गेल्याने या कुटुंबातील व्यक्तींनी संताप व्यक्त केला असला तरी संबंधित पाठीशी घालणाऱ्या व हप्ता घेणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात लवकरच वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी करणार असून, त्यांची खाते नियाह चौकशी लावणार असल्याचे महिला मंडळीनी आपल्या प्रतिक्रिया देताना भावना व्यक्त केल्या आहे. याबाबत राज्यसरकार व पोलीस महानिरीक्षक काय कारवाई करतील हे येणाऱ्या काळात कळेलच,तर दुसरीकडे विकासाकडे वाटचाल करीत असताना आपल्याच बारामतीत हजारो लिटर हातभट्टी सप्लाय होत असताना भल्या पहाटे,कार,व्हॅन,जीप,व टूव्हीलरवर दुधाच्या कैन्ड मध्ये ही दारू सप्लाय होत असून त्यावर कारवाई का होत नाही?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून राज्य उत्पादन विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीसखात्याकडून देखील कारवाईस विलंब लागत असून नक्की अश्या दारू सप्लाय करणार्यांना पाठीशी कोण घालतय अशी चर्चा सद्या रंगताना दिसत आहे.अनेकांचे या दारूपायी बळी गेले असून हॉटेल, ढाबे, घरगुती व टपऱ्यावर अवैध दारू विकली जात आहे,बारामती, नीरा,जेजुरीसह अनेक गावांततुन दारू सप्लाय होत आहे अशी माहिती मिळतेय, तर शहरातील आसपासच्या भागातून हातभट्टी नदी, ओढे लगत व शेतात चोरून भट्ट्या लावल्या असून यावर कारवाई होईल का?यातून गब्बरगंड झालेले मालक राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून मासिक हप्ते ठरवून बिनदास्त विक्री करीत आहे, यातूनही कारवाई झालीच तर ती छोटे छोटे गोरगरीब आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी करीत असलेल्या धंद्यावर होते तर मोठ्या व्यावसायिकाला सोडून दिले जाते हे किती दिवस चालणार आहे याचे उत्तर मिळू शकत नाही.कुणी तक्रारी केल्याच तर त्यांच्यावर अडचणींचा डोंगर उभा असतोच खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे हे ठरलेलं असतं अशी काही त्रस्त झालेल्या समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींनी बोलून दाखविले. ट्राय डे असेल त्यादिवशी तर बंद दुकानाबाहेर लहान मुलं हमखास दारू पाहिजे का असे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बोलत असतात.व जवळच दडवून ठेवलेल्या पिशवीतून, गाडीच्या डिकीतून दारूची बाटली काढून ज्यादा भावाने विक्री करताना पहावयास मिळत आहे, याकडे संबंधित विभागाचे का जात नाही, अल्पवयीन मुलं पैशाच्या लोभापायी अशी कामे करीत असताना ते वाईट मार्गाला लागून पुढे ते गुन्हेगारीकडे वळली जात असल्याचे दिसत आहे. याबाबत अवैध दारू विक्री व सप्लाय करणार्यांवर कारवाई होईल का?हे तेवढेच महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment