अबब..महिलांना शरीर सुखाची मागणी करण्यासाठी चक्क करायचा हॉटेलमधून व्हिडीओ कॉल; 30 पेक्षा जास्त महिलांना केला होता फोन..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 2, 2023

अबब..महिलांना शरीर सुखाची मागणी करण्यासाठी चक्क करायचा हॉटेलमधून व्हिडीओ कॉल; 30 पेक्षा जास्त महिलांना केला होता फोन..!

अबब..महिलांना शरीर सुखाची मागणी करण्यासाठी चक्क करायचा हॉटेलमधून व्हिडीओ कॉल; 30 पेक्षा जास्त महिलांना केला होता फोन..!
पाचोड :- ऐकावे ते नवलच माणसांची विकृती किती व कोणत्या थराला जाईल सांगता येत अशीच एक धक्कादायक घटना घडली याबाबत मिळालेल्या माहिती नुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील गावात एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. 29 वर्षीय एक तरुण गावातील महिलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा. विशेष म्हणजे फोन केल्यावर सात-आठ दिवस फोन बंद करून ठेवायचा. आतापर्यंत त्याने गावातील 30 पेक्षा जास्त महिलांना अशाच प्रकारे व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल केले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून
गावातील महिलांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. दरम्यान, या तरुणाने अशाच एका महिलेला व्हिडिओ कॉल केला आणि तो कॉल महिलेच्या पतीने उचलला.
त्यामुळे व्हिडिओ कॉल गावातील कोणत्या ठिकाणाहून आला याचा अंदाज महिलेच्या पतीला आला आणि आरोपीचा भांडाफोड झाला. या प्रकरणी पोलिसांत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.**** ***, (वय 29 ) असे आरोपीचे नाव आहे.याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील याठिकाणी  **** *** याचे हॉटेल आहे. दरम्यान, याच
हॉटेलमध्ये बसून तो दररोज गावातील वेगवेगळ्या महिलांना व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल करायचा. त्यानंतर महिलांसोबत अश्लिल भाषेत संवाद करायचा. विशेष म्हणजे मागील चार ते पाच महिन्यापासून सतत हा प्रकार सुरु होता. त्यामुळे गावातील महिलांनी कुटुंबातील  सदस्यांना देखील याबाबत माहिती दिली होती. मात्र,व्हिडिओ कॉल केल्यावर **** हा तो नंबर पुढील सात-आठ दिवस बंद ठेवायचा. त्यामुळे त्यावर संपर्क होऊ शकत नव्हता. दुसऱ्यांदा फोन आला नाही म्हणून संबंधित महिला आणि त्याचे कुटुंब देखील त्या गोष्टीचा पुढे कुठेही वाच्यता करत नव्हते. परंतु, दुसऱ्या दिवशी **** हा
पुन्हा दुसऱ्या महिलेला फोन करायचा. त्यामुळे गावातील नागरिक यामुळे वैतागले होते.दरम्यान, **** याने गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा
गावातील एका महिलेला व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल केला. मात्र, यावेळी त्या महिलेचा पती घरी असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉल उचलला. तसेच गावातील महिलांना व्हिडिओ कॉल करणारा हाच व्यक्ती असल्याचे त्यांचे लक्षात आले. तर, व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारे ठिकाण त्यांनी तत्काळ ओळखले हॉटेलमधून कोणीतरी हे कॉल करत असल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. दरम्यान, हॉटेल चालक **** *** हा गावातील महिलांना फोन करतो याबाबत देखील त्यांनी खात्री केली. दुसऱ्या दिवशी महिलेच्या पतीने गावातील नागरिकांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यामुळे अनेक गावकरी थेट त्यांच्या हॉटेलवर जाऊन पोहचले तसेच, त्याला जाब विचारत त्याच्या मोबाईल तपासला. यावेळी गावातील अनेक महिलांचे त्याच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्याचे समोर आले. तसेच, त्याने गावातील आतापर्यंत 30 पेक्षा अधिक महिलांना व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल केल्याचे देखील समोर आले. त्यामुळे गावातील काही तरुणांनी
त्याला चोप दिला. त्यानंतर आरोपी **** *** गावातून फरार झाला. दरम्यान, शनिवारी दुपारी एका महिलेच्या तक्रारीवरून **** ***  यांच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळीसह गोविंद राऊत हे करत आहेत.

No comments:

Post a Comment