बारामतीत अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या प्रकारात वाढ.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 27, 2023

बारामतीत अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या प्रकारात वाढ..

बारामतीत अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या प्रकारात वाढ..
बारामती:- बारामती हे विकसित होत असलेले शहर व तालुका असून याठिकाणी विविध शासकीय निमशासकीय कार्यलये मोठ्या दिमाखात थाटली जात असताना करोडो रुपये निधी खर्च केला जात असताना शिक्षण क्षेत्रातील वाढती गर्दी पाहता तसेच कॉलेज,हायस्कूल, शाळा, अकेडमी, क्लासेस या ठिकाणी व आजू बाजूच्या परिसरात हसमखास अल्पवयीन व तरुण युवक टू व्हीलर वर ट्रिपल,डबल सीट घिरट्या मारताना दिसत आहे, तसेच कॅफेमध्ये अश्या अल्पवयीन मुलींना फसवुन वाढदिवसाच्या आड अक्षील नखरे चालू असतात यावर कधी कारवाई होईल हे येणाऱ्या काळात कळेल परंतु  आपल्या आईबापांना खोटं बोलून शिक्षणाच्या नावाखाली हुलडबाजी करण्यात सद्या व्यस्त असलेली तरुण मुले मुली व्यस्त असताना दिसत आहे, खोट्या आमिषाला बळी पडत अल्पवयीन मुली भुरट्या मुलांना त्यांच्या खोट्या प्रतिष्ठाला भाळतात, यामुळे पुढे याचा परिणाम वेगळाच दिसतो,तर कुणी आत्महत्या करतो तर कुणी घरातून निघून जातात ,मात्र यामध्ये आपल्या आईवडील,भाऊ,नातेवाईक यांच्या वर काय परिणाम होईल याचे भान उरले नाही.नुकताच बारामतीत विवाहित पुरुषाने अठरा पूर्ण होण्याआधी व लग्न ठरले असताना कामावर असणाऱ्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल होऊनही अद्याप पुढे काय झाले हे कळले नाही, काही प्रकरणात शिक्षण घेणाऱ्या मित्राद्वारे 17 वर्षे असणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला मात्र पोलिसांना समजल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढे त्यांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून समज देण्यात आली असे कळतंय,नासमज असणाऱ्या अल्पवयीन मुलींनी आपला जोडीदार शोधण्याची व त्याच्या भूलथापांना बळी पडण्याची घाई करू नये,आपले शिक्षण पूर्ण करून आईवडिलांच्या व स्वतःच्या विचारांची देवाणघेवाण करून योग्य जोडीदार निवडावा नाहीतर प्रेमाच्या जाळ्यात फसून आपल्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही  यांच आत्मचिंतन करण्याची, समुपदेशन करण्याची खरी गरज आहे.

No comments:

Post a Comment