महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते सन्मान..
पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पुणे पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने २४ डिसेंबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अजित दादांच्या समोर तडाखेबंद भाषण करून आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. त्यावर बोलतांना अजित दादांनी पत्रकारांच्या मागण्या संदर्भात वसंतराव मुंडे यांनी जो प्रस्ताव दिला आहे त्या संदर्भात मुंबई येथे बैठक घेवून मार्ग
काढण्याचे आश्वासन दिले. गौरव समारंभाला ना. अजित दादा यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, राज्य चिटणीस विश्वास आरोटे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी बोलतांना पत्रकारसंघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वर्तमानपत्र खरेदीवर कर सवलत देण्याचा
विषय प्रभावीपणे मांडला. या संदर्भात मुंडे यांनी यापूर्वी अनेक लोक प्रतिनिधींना अवगत केलेले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी वृत्तपत्र खरेदीवर कर सवलत देण्याचा विषय समजून
घेतला. तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमात वसंत मुंडे यांनी शेरो शायरी करत अजित दादांच्या राजकिय प्रवासावर दिलखुलास भाष्य केले. त्याला दाद देवून ना. पवार यांनी मुंडे
यांच्या विषयी सद्भावना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment