बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकराचे नामकरणासाठी आम्ही लवकरच सकारात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर:- दि.18 डिसेंबर 2023 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान बारामती
बस स्थानकास विश्वरत्न डॉ.आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामकरण हक्क संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष मा. सागरजी डबरासे यांनी दिले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बारामती बस स्थानकाला विश्वरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचे या
मागणीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ.
बारामती बस स्थानकाच्या मुख्य भिंतीवर
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बारामती बस
स्थानक असे प्रतीकात्मक नाव लिहिले होते
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती
शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा मागे घेतला जाईल असे सांगितले, नामांतर संघर्ष कृती समिती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत विष्णू सोनवणे, उपाध्यक्ष अँड.गणेश मारुती चव्हाण उपस्थित होते.अशी माहिती मा. सागरजी डबरासे यांनी दिली आहे.त्यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment