धक्कादायक..अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेले प्रकरण;ठाणे अंमलदार आणि प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 21, 2023

धक्कादायक..अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेले प्रकरण;ठाणे अंमलदार आणि प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार..

धक्कादायक..अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेले प्रकरण;ठाणे अंमलदार आणि प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..
बारामती:- माननीय अध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली यांना नुकताच तक्रारी अर्ज देण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुपा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण महाराष्ट्र येथे आंतररष्ट्रीय मानवाधिकार दिना दिवशी अपहरणाबाबत पोलिसांनी तक्रार लिहून न घेतल्याने / कारवाई न केल्यामुळे सागर दिलीप जगताप याचे मृत्यूस जबाबदार सुपा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार व प्रभारी अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणे बाबतचे पत्र देण्यात आले यामध्ये दिनांक १०/१२/२०२३ रोजी दुपारी २:०० वा सुमारास ५ ते ६ अनोळखी लोकांनी दिलीप सोपानराव जगताप राहणार दंडवाडी सुपा ता. बारामती जि. पुणे यांना जबरदस्तीने गाडीत घालून अपहरण करून घेऊन गेले त्यानंतर त्यांची मुलगी (उर्मिला) व नातेवाईक यांनी सुपा पोलीस ठाणे, ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी जाऊन सदर घटना सांगून तक्रार दाखल करण्याची विनंती केली परंतु त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही, व या घटनेबाबत काहीच कायदेशीर कारवाई केली नाही. ( याबाबत सुपा पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवावे व पहावे )सदर अपहरन करते यांनी दि.११/१२/२०२३ रोजी दिलीप जगताप यांचेकडून जबरदस्तीने काही नोटरी दस्त तयार करून त्यावर त्यांच्या सह्या घेतल्या रात्री १२ वा दरम्यान त्यांना सुपा पोलीस ठाणे येथे आणून रात्री १ वा त्यांचे राहते घरी दंडवाडी येथे सोडून निघून गेले, सदर घटनेने दिलीप जगताप घाबरलेले असल्याने दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरी गेले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अपहरण करते यांना त्यांना सतत फोन येत होता निबंधक कार्यालयात येवून जमिनीचा खरेदी दस्त करून दे नाहीतर आम्ही सोडणार नाही. त्यांनी सतत धमक्यांचे फोन यायला लागल्याने फोन बंद केले. त्यामुळे सदरचे अपहरण करणारे लोक १) संतोष चोपडे २) प्रताप क्षीरसागर ३) वैशाली भोसले ४) जिज्ञासा नायकवाडी ५) प्रगती हाजकुडे यांनी १३/१२/२०२३ रोजी दुपारी १२ वा दिलीप जगताप यांचे राहते घरी दंडवाडी सुपा येथे येवून सागर दिलीप जगताप यास शिवीगाळ करून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले आणि पळून गेले, लोकांनी सागराला विझवण्याचा प्रयत्न करून दवाखान्यात नेले,  यामध्ये सागर गंभीर जखमी झाला असल्याने पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल केले परंतु दि.१६/१२/२०२३ रोजी उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला. सदरची गंभीर घटना मला नातेवाईक संदीप मोरे यांनी सांगितल्याने मी आपल्या मेहेरबान आयोगाकडे तक्रार दाखल करीत आहे, यामध्ये सुपा पोलीस ठाण्याचे, ठाणे अंमलदार व प्रभारी अधिकारी यांनी वेळीच कारवाई केली असती किंवा अपहरणाचा गुन्हा दाखल केला असता किंवा कायदेशीर कारवाई केली असती तर सागर दिलीप जगताप वय २८ वर्षे यांचा जीव गेला नसता या सर्व घटनेला सुपा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार आणि प्रभारी अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे यांचेवर देखील गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदर घटनेची सी.बी.आय. मार्फत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत व मयताच्या कुटुंबास नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत अशी विंनतीचे तक्रारी अर्ज पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण पुणे यांना देण्यात आले.अशी माहिती तुषार झेंडे पाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांनी दिली.

No comments:

Post a Comment