बापरे..१२ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जेजुरीला पळवले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 1, 2024

बापरे..१२ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जेजुरीला पळवले..

बापरे..१२ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जेजुरीला पळवले..
पुणे :-अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे प्रकारात वाढ होत असलेले दिसत असले तरी यासाठी कडक कायदा करून ठोस कारवाई होणे गरजेचं आहे,नुकताच अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी गोड बोलून, तिला लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणावर चंदननगर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.वडगाव शेरी येथील वडेश्वरनगरमध्ये शनिवारी (ता. २९)
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली होती.याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत आंबादास कांबळे (वय १८,रा. मु. पो. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर)याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३४ वर्षीय आईने चंदननगर पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.२९) सकाळी फिर्यादी यांची मुलगी वही आणण्यासाठी
दुकानात जाते असे सांगून घरातून गेली होती. दरम्यान,आरोपी अनिकेत कांबळे याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून जेजुरी येथे पळवून नेले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अनिकेत कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करीत आहेत.

No comments:

Post a Comment