खळबळजनक..डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा बहाणा करून खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी जेरबंद..
बारामती:- दिनांक 12 2 2014 रोजी बारामती येथील डॉक्टर यांना आरोपी महिला नामे ज्योती कदम हिने भेटण्यासाठी बोलविले. त्याप्रमाणे डॉक्टर हे तिला भेटले असता तिने डॉक्टरांना तिच्यासोबत लॉजवर येण्याचा आग्रह केला. परंतु डॉक्टरांनी तिचेसोबत लॉजवर येणार नसल्याचे सांगितल्यानंतर ते बारामती सिटी ईन चौक येथील ऐश्वर्या हॉटेल येथे नाश्त्यासाठी गेले. तिथे देखील महिला आरोपी ज्योती कदम ही डॉक्टरला लॉजवर तिच्यासोबत येण्यासाठी उद्युक्त करीत होती. नाष्टा संपल्यानंतर डॉक्टर व महिला आरोपी ज्योती कदम असे सूर्यनगरी वेदांत करिअर अकॅडमी समोर बोलत असताना महिला आरोपीचे साथीदार कुख्यात गुंड सतीश सूर्यवंशी, समीर सय्यद, चेतन गायकवाड, रामहरी चितळकर व अंकिता भोसले यांनी ईरटीका कार मध्ये डॉक्टर यांना मारहाण करून खंडणीसाठी अपहरण करून लोणी देवकर एमआयडीसी येथे घेऊन गेले. तिथे डॉक्टरांना महिला आरोपी ज्योती कदम ही त्यांची बहीण असल्याचे सांगून तिच्यासोबत लग्न करण्याची किंवा तिचे उदरनिर्वासाठी दहा लाख रुपये देण्याची मागणी केली. डॉक्टरांनी त्यांना माझा ज्योती कदम हिच्या सोबत काही एक संबंध नसून पैसे देण्यास नकार देताच त्यांनी डॉक्टरांना मीडियामध्ये बातमी देऊन बदनामी करण्याची धमकी दिली. तरीदेखील डॉक्टर हे त्यांना पैसे देण्यास तयार नसल्याने त्यांनी त्यांचा साथीदार इंदापूर येथील कुख्यात गुन्हेगार निलेश बनसोडे व शुभम भगत यांना बोलून घेतले. त्या सर्वांनी डॉक्टरांना मारहाण करून खंडणी उकडण्यासाठी आळंदी येथे नेवून लग्न करण्याचा बहाणा करून सोलापूर पुणे रस्त्याने निघुन पाटस येथे घेवून गेले. तेथे त्यांनी डॉक्टरांकडून खंडणी उकळण्यासाठी बारामती येथील गुन्हेगार झुंजार उर्फ गणेश मागाडे यास बोलवून घेतले. त्या सर्वांनी फिर्यादी यांना जीव ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी हे त्यांस सहा लाख रुपये देण्यास तयार झाले. त्याप्रमाणे दिनांक 13 .2.2024 रोजी सकाळी अकरा वाजता झुंजार माघाडे हा डॉक्टरांच्या हॉस्पिटल येथे येऊन चेक घेऊन जाणार असे ठरले. त्यानंतर त्या टोळीने डॉक्टरांना सोडले.
दिनांक 13/ 2/2024 रोजी यातील फिर्यादी डॉक्टर हे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी सदरचा घडला प्रकार पोलिसांना सांगितला. यातील आरोपी हे खंडणी स्वीकारण्यासाठी येत असल्याने सपने श्री राजेश माळी पोलीस हवालदार राम कानगुडे वगैरे हे वेशांतर करून फिर्यादी डॉक्टरांच्या दवाखान्यात पेशंट बनुन आले. आरोपी झुंजार माघाडे याने डॉक्टरांकडून चेक स्वरूपात खंडणी स्वीकारतात त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर यातील फिर्यादी डॉक्टर यांच्या तक्रारीवरून संपूर्ण टोळी विरुद्ध खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हा बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 78/2024 अन्वये दाखल करण्यात आला.
दि 6/3/ 2024 रोजी यातील उर्वरित आरोपींचा शोध घेत असताना बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस हवालदार राम कानगुडे यांना मिळालेल्या माहितीवरून यातील आरोपी नामे ज्योती कदम, अंकिता भोसले, निलेश बनसोडे, चेतन गायकवाड यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये सदर सर्व आरोपींची गुन्हेगारी टोळी असल्याचे व त्यांनी यातील फिर्यादी डॉक्टर यांना सुनियोजित कट रुचून खंडणीसाठी अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपींना माननीय न्यायालयाने दिनांक 25/03/2024 रोजेपर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सपोनी श्री राहुल घुगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, मा अपर पोलीस अधीक्षक श्री जाधव, मा उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग श्री राठोड यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गोरख गायकवाड सपने श्री राहुल घुगे, पो स ई श्री राजेश माळी, श्री गणेश पाटील, श्री दत्तात्रय लेंडवे पोलीस अंमलदार राम कानगुडे, राजश्री आटोळे, संतोष मखरे , दीपक दराडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment