बारामतीतील एका बड्या नेत्याचा देशी दारूचा कारखाना केमिकल झोनमध्ये हलवा; सुनील सस्ते यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 10, 2024

बारामतीतील एका बड्या नेत्याचा देशी दारूचा कारखाना केमिकल झोनमध्ये हलवा; सुनील सस्ते यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

बारामतीतील एका बड्या नेत्याचा देशी दारूचा कारखाना केमिकल झोनमध्ये हलवा; सुनील सस्ते यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

विद्या प्रतिष्ठान संस्थेचे १० हजारहून अधिकांच्या आरोग्यास धोका
बारामती:- बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये एका बड्या नेत्याचा देशी दारूचा कारखाना असून, त्याच्या सांडपाण्यामुळे आजूबाजूच्या गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचे पाणी शेजारील गावामधील ओड्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार बारामती नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी शुक्रवारी (दि. ८)यासंबंधीचे निवेदन देत सामंत यांच्याशी चर्चा केली.
  निवेदनात नमूद बारामती केल्यानुसार,बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये फोर्जिंग कंपन्या व ऑटोमोबाईल इंडस्ट्री सुरू असताना एका बड्या नेत्याची केमिकल झोनमध्ये मान्यता असणारी देशी दारूची फॅक्टरी एमआयडीसीच्या प्लॉटमध्ये सुरू आहे.या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा तेथे नाही. कंपनीचे हे पाणी शेजारील गावातील ओढ्यांमध्ये सोडण्यात आले आहे.

रुई. वंजारवाडी, सावळ या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. कंपनीचा बॉयलर हा देखील साखर कंपनीच्या बगॅसवर चालू आहे. कंपनीपासुन ७०० मीटर अंतरावर विद्या प्रतिष्ठान सारखी शैक्षणिक संस्था आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. १० हजारहून अधिक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत.नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारी ही कंपनी स्थलांतरित करण्यात यावी.

शेजारील कुरकुंभ एमआयडीसी केमिकल साठी सुरू असताना. बारामतीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये ही कंपनी का सुरू आहे. असा प्रश्न निर्माण झाला असून सदर कंपनी तेथे स्थलांतरित करण्यात यावी. बारामती एमआयडीसी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही कंपनी ६ महिन्यांपासून सुरू आहे. प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कुरकुंभ मध्ये मध्यंतरी जे अमली पदार्थ रॅकेट सापडले ते देखील बारामती प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्याचे सस्ते यांनी पत्रात नमूद केले आहे. अप्पर पुणे जिल्हा व बारामती तालुका यांच्या उद्योगांमुळे उड़ता पंजाब पध्दती वाटचालीकडे सुरू आहे. आपण या बाबींकडे तात्काळ लक्ष देऊन ही कंपनी जेथे केमीकल कंपन्या सुरु आहेत तेथे स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी सस्ते यांनी उद्योग मंत्र्यांकडे केली आहे. माहितीसाठी खासदार शरद पवार, तसेच जिल्हाधिकारी, औद्योगिक वसाहतीचे रीजनल ऑफिसर व कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment