धक्कादायक..बारामती तालुक्यातील या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार;विज बिल जास्त आल्याचे कारण येतंय पुढे..
मोरगाव:- बारामतीत नक्की चाललंय काय?चक्क कोयता, कटर, कुऱ्हाड याने गेल्या काही दिवसात अनेक खून केले नवरा बायको, तर कुठे महिलेवर, तर कुठं युवकावर असे जीवघेणे हल्ले झाले सद्या लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना अशी घटना घडल्याने वातावरण बिघडत चालल्याचे दिसत आहे,नुकताच बारामती तालुक्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या मोरगावमध्ये कोयत्याने वार झाल्याची धक्कादायक
घटना घडली असून वीज बिल जास्त येते,
मीटर रीडिंग तपासावे अशी सातत्याने
मागणी करूनही दखल घेतली जात
नसल्याने एका वीज ग्राहकाने महावितरणच्या टेक्निशियन महिलेवर चक्क कोयत्याने वार केले आहेत. महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली
असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात
आले होते ती मयत झाल्याचे समजतंय. दरम्यान संशयित आरोपी
अभिजीत पोते याला ताब्यात घेण्यात आला आहे,अभिजीत पोते हा महावितरणचा वीज ग्राहक असून त्याच्या घरातील विज बिल सातत्याने जास्त येते अशी तो तक्रार करत होता. माझ्या घराचे वीज बिल मीटरचे रीडिंग
घेऊन हे बिल का जास्त येते हे पहा असे तो
सातत्याने सांगत होता, मात्र त्याची दखल
घेतली जात नाही, असे त्याला वाटल्याने
त्याने चिडून जाऊन महावितरणच्या
कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यामध्ये रिंकू
राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला
त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने
तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक
झालेल्या या घटनेने रिंकू थिटे ही महिला
कर्मचारी देखील घाबरली, मात्र तोपर्यंत
अभिजीत पोते याने तिच्यावर वार केले
होते. ती यात गंभीर जखमी झाली होती त्यामध्ये ती मयत झाल्याची माहिती पुढे येतेय. पोलीस तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment