खळबळजनक..पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार,PSIवर गुन्हा दाखल.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 16, 2024

खळबळजनक..पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार,PSIवर गुन्हा दाखल.!

खळबळजनक..पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार,PSI
वर गुन्हा दाखल.!
पुणे:-महिला अत्याचाराच्या वाढत असणाऱ्या घटना व  वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक आहे, रक्षकचं भक्षक झाल्याचे चित्र पुण्यातून
दिसून आलं आहे.पुण्यात पोलिस खात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील शिवाजीनगर येथील आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर येथे तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.किरण माणिक महामुनी असं आरोपी पोलिस उपनिरिक्षकाचं नाव आहे. या प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुणी पोलिस भरतीची तयारी करत
आहे. पोलिस उपनिरिक्षकाने तरुणीसोबत शारिरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. तरुणी पुण्यात पोलिस भरतीची तयारी करत होती. त्यावेळी तीची ओळख माणिक
यांच्याशी झाली. भरतीचे आमिष दाखवून तरुणीशी जवळीक साधून शारिरिक संबंध ठेवले.
मागिल काही महिन्यांपासून तरुणी आणि माणिक हे एकमेकांना चांगले ओळखीचे झाले. तरुणी गरोदर झाल्यानंतर माणिक यांनी तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास सांगितला. त्यानंतर कंटाळून तरुणीने या घटनेची
माहिती पोलिसांना दिली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment