अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते;असे देवेंद्र फडणवीस का म्हणाले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 21, 2024

अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते;असे देवेंद्र फडणवीस का म्हणाले..

अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते;असे देवेंद्र फडणवीस का म्हणाले..
मुंबई:- 2014 दरम्यान राज्यात सिंचन घोटाळा खूपच गाजला होता. अजित पवार यांच्यावर याबाबत आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच हे आरोप केले होते. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले
त्यात चुकीचे काही नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हटले आहे.या प्रकरणात मी जे प्रश्न उपस्थित केले, त्यानुसार कारवाई करण्यात आली. सिंचन घोटाळा प्रकरणी २०१४ मध्ये
अजित पवार, तर गँगस्टर इक्बाल मिर्चीशी असलेल्या कथित संबंधांबद्दल प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करणे ही चूक होती का? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती खूपच बदलली आहे. आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एक झाले असून अजित पवारांनी
भाजपला पाठिंबा दिला आहे. अनेक वर्षे विरोधात असताना, भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्याच सोबत युती करण्याचा निर्णय झाल्याने आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी लावलेले सर्व आरोप
खरे ठरले. मी उपस्थित केलेल्या सर्व बाबींवर कारवाई करण्यात आली. त्या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले, आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि काही जणांना दोषीही ठरवण्यात आले.तसेच भ्रष्ट कारभाराला आळा बसला आणि निविदा प्रक्रियेत सर्व नवीन नियम व अटी लागू करण्यात आल्या.दरम्यान, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे
त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी त्यांच्यावर (अजित ) थेट भूमिका असल्याचे म्हटले नाही. आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भूमिकेचे तपासत आहोत. शेवटी त्यांना काही सापडले नाही. म्हणजे एकाही आरोपपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यामुळे हे प्रकरण जवळपास मिटले असल्याचे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment