वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात सुट मिळावी याबाबत विचार करू-नितीन गडकरी..
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे यांच्या शिष्टमंडळाला ग्वाही
नागपूर (प्रतिनिधी):- लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहूमत मिळणार असून सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केलेली वृत्तपत्र खरेदी करणार्यांना वार्षिक पाच हजार रूपयाची उत्पन्न करात सुट द्यावी ही मागणी आपण संसदेच्या सभागृहात मांडू आणि सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नागपूर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून पत्रकार संघाचे निवेदन आणि माहितीपुस्तिका देवून चर्चा केली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न, वर्तमानपत्रांच्या समस्या आपल्याला माहित आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यानंतर संसदेच्या सभागृहात वृत्तपत्रांच्या मागणीसंदर्भात आपण पुढाकार घेवू राज्य पत्रकार संघाने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजाराची सुट द्यावी ही मागणी वृत्तपत्र व्यवसायाला बुस्टर डोस ठरणार आहे. प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने नागपूर विभागातील विविध पक्षाच्या उमेदवारांना निवेदन देवून पत्रकारांच्या प्रश्नाकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे यांच्यासह सरचिटणीस अंकुश डाखोरे, संघटक मोहम्मद इलियास व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment