*संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 31, 2024

*संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन*

*संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन*
बारामती (प्रतिनिधी): - संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने व सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने रविवाऱी (2 जून) सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत येथील सत्संग भवनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
     सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलन येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित स्व. माणिकबाई चंदूलाल सराफ रक्तपेढी यांच्यामार्फत होणार आहे
    संत निरंकारी मंडळा मध्ये रक्तदान शिबिराची ही श्रुंकला 23 ऑक्टोबर 1986 पासून सुरू झाली. तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांनी स्वतः रक्तदान करून या रक्तदानाला सुरुवात केली. दरवर्षी 24 एप्रिल मानव एकता दिवस या दिवशी संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. संत निरंकारी मिशनचा रक्तदानाचा सामाजिक पैलू मनुष्यमात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उद्योनमुख करत आहे
      रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री नंदकुमार झांबरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment