खा.सुप्रिया सुळे यांनी घेतली अहिवळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट..
बारामती/प्रतिनिधी:-बारामती नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांचे वडील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक झुंबरलाल अहिवळे यांचे मंगळवार (ता.२८) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनाच्या वृत्ताची बातमी समजताच खा.सुप्रिया सुळे यांनी अहिवळे यांच्या निवासस्थानी जात भारत अहिवळे आणि अहिवळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी खा.सुळे यांनी झुंबरलाल अहिवळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.त्याचसोबत काल भारतीय जनता पक्षाचे नेते माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी देखील अहिवळे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करत सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
याप्रसंगी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.एस.एन जगताप,शहराध्यक्ष ॲड.संदिप गुजर,माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे,संतोष काकडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment