12 वी पास झाल्याचा आनंद म्हणून गेली फिरण्यासाठी मात्र उज्जैन मध्ये झाला घात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 2, 2024

12 वी पास झाल्याचा आनंद म्हणून गेली फिरण्यासाठी मात्र उज्जैन मध्ये झाला घात..

12 वी पास झाल्याचा आनंद म्हणून गेली
फिरण्यासाठी मात्र उज्जैन मध्ये झाला
घात..
कोल्हापूर:-फिरण्याचा आनंद किती काळ टिकला याची घडलेल्या घटनेवरून हादरवून सोडणारी घटना घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 12 वीचा निकाल लागला. परिक्षा आणि
त्यानंतर निकाल काय लागणार याच्या तणावात
अनेक विद्यार्थी होती. पण निकाल लागला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता पुढच्या वर्षाला प्रवेश घेण्याची गडबड.या सर्व गोष्टी पाहात थोडं फिरून येऊन फ्रेश व्हावं असा
प्लॅन 19 वर्षाच्या जानवी चव्हाणने केला होता. निकाल लागला चांगले गुण मिळाले. त्यामुळे तिच्या परिवारासह तिने उत्तर भारत फिरण्याचा प्लॅन बनवला. ते फिरायला गेलेही. पण पुढे तिच्याबरोबर जे झाले ते तिच्या संपुर्ण
कुटुंबाला हादरवून सोडणारे होते.जानवी प्रकाश चव्हाण ही तरूणी कोल्हापुरच्या फुलेवाडीची राहाणारी. नुकतीच तिने बारावीच्या परिक्षेत
चांगले यश मिळवले. त्यानंतर तिने कुटुंबा बरोबर उत्तर भारतामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार उत्तर भारतात ते सहलीला गेले. या सहलीत ते काशी,मथुरा, आयोध्या, उज्जैन या ठिकाणी ती देवदर्शन केले.मात्र या ठिकाणी प्रचंड उकाडा आहे. उष्णतेची लाट असल्याने त्याचा फटका जानवीला बसला. ती कुटुंबासमवेत उज्जैनमध्ये दर्शनासाठी गेले होते. तिथेच
तिला उलटी आणि मळमळ सुरू झाली. तिला अशक्त पणा जाणवू लागला. जानवीला त्रास होत आहे हे लक्षात आल्यानंतर तिचे कुटुंबीयही घाबरले. त्यांनी आपली सहलमध्येच थांबवत कोल्हापुरकडे जाण्याचा निर्णय सहलीमध्येच थांबवत कोल्हापुरकडे जाण्याचा निर्णय
घेतला.कोल्हापुरकडे परत येत असताना जानवीची तब्बेत आणखीनच बिघडली. शिर्डी पर्यंत ते पोहचले होते. त्रास जास्त होत असल्याने तिला शिर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला हिट स्ट्रोक झाल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. जानवीची प्रकृती बिघडत चाचली होती.
जानवीचा 29 मे रोजी वाढदिवस होता. यामुळे जानवी आनंदात होती. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी 30 मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे ती थोडी तणावातही होती. उष्माघात झाल्याचे
डॉक्टरांनी सांगितले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते.पण त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments:

Post a Comment