बारामतीत विवाहीत महिलेचा मानसिक व शारीरीक छळातून गळफास घेवून आत्महत्या करणेस प्रवृत्त केलेप्रकरणी गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 28, 2024

बारामतीत विवाहीत महिलेचा मानसिक व शारीरीक छळातून गळफास घेवून आत्महत्या करणेस प्रवृत्त केलेप्रकरणी गुन्हा दाखल..

बारामतीत विवाहीत महिलेचा मानसिक व शारीरीक छळातून गळफास घेवून आत्महत्या करणेस प्रवृत्त केलेप्रकरणी गुन्हा दाखल..
बारामती:-दि.28/05/2024 रोजी दुपारी 12/30 वा.दरम्यान मौजे भिगवण रोड बारामती ता. बारामती जि. पुणे, येथे  आरोपी याचे राहते घरात गळफास घेवून आत्महत्या करणेस प्रवृत्त केलेप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये नुकताच गुन्हा दाखल झाला असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
फिर्यादी विक्रांत राजेश तागडकर वय 25 वर्षे व्यवसाय शिक्षण रा.  162 वडारवाडी पोस्ट भिंगार ता.जि. अहिल्यानगर ( अहमदनगर ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हकीकत अशी की,
ता. 28/11/2022 रोजी लग्नानंतर पाच ते सहा दिवसांनी माझी बहीण सौ. नंदिनी शुभम पवार वय 21 वर्षे हिला तिचे सासरे मौजे बारामती ता. बारामती येथे नांदत असताना तिचा नवरा नवरा शुभम अशोक पवार, सासू सौ. लिलाबाई अशोक पवार,सासरे अशोक श्रीपती पवार, दिर अक्षय अशोक पवार यानी तेव्हापासून वारंवार शिवीगाळ, दमदाटी करुन आमचा लग्नामध्ये मान पान केला नाही तसेच, माहेरहून पाच लाख रुपये आण, दोन तोळे सोने आण असे म्हणून तिला मारहाण करून तिचा वारंवार मानसिक व शारीरीक छळ करून तिला ता. 28/05/2024 रोजी दुपारी 12/30 वा. चे पुर्वी (नक्की वेळ माहित नाही) गळफास घेवून आत्महत्या करणेस प्रवृत्त केले आहे. म्हणून त्यांचेविरुद्ध कायदेशिर फिर्याद आसल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन गु. रजि.न.398/2024 भा.द.वि. कलम 304 (ब),306,498 (अ),323,504,506,34 नुसार 1) शुभम अशोक पवार, 2) लिलाबाई अशोक पवार, 3) अशोक श्रीपती पवार, 4) अक्षय अशोक पवार सर्व रा. मौजे बारामती ता. बारामती यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोसई घोडके यांनी गुन्हा दाखल करून घेतला पुढील तपास पोसई जगदाळे करीत आहे.

No comments:

Post a Comment