खळबळजनक..पैशाचा पाऊसाचे आमिष पडले तेरा लाखाच्या आसपास..
इंदापूर:-महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथाव जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मिळालेल्या माहितीनुसार पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून १२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक
केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी सात जणावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सतीश कृष्णा मांडवे(रा. श्रीपूर, ता.माळशिरस) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. पोलिसांनी उत्तम लक्ष्मण भागवत (रा. घोलपवाडी ता.इंदापूर),काळू रोहिदास गाडे, (रा. जांबुड,ता. माळशिरस, जि. सोलापूर), श्रीकृष्ण खुडे, (रा.बोरगांव, ता.माळशिरस, जि.
सोलापूर) व दोन अनोळखी महाराज व अनोळखी एक महिला व एक पुरुष असा सात जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० जून २०२४ ते १७
ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये घोलपवाडी गावच्या हद्दीमध्ये भागवत याने सतीश मांडवे यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून, 'तुझ्या सर्व अडचणी दूर करतो,' असे सांगितले.
यासाठी भागवत याने घोलपवाडीमध्ये त्याच्या राहत्या घरामध्ये पूजाविधी व जादूटोणा करून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून मांडवे याच्याकडू यांच्याकडून रोख व ऑनलाइनद्वारे १२
लाख ९८ हजार रुपयांचे रक्कम घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे पोल निरीक्षक कोकणे करीत आहेत.
No comments:
Post a Comment