खळबळजनक..मुलासमोरच पत्नीची क्रूरपणे हत्या,त्याचा व्हिडीओ बनविला..
एवढ्यावरच न थांबता नराधम पतीने हत्येचे व्हिडिओ शूटिंग केले. यानंतर नराधम पती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निर्दयी पतीने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नीच्या मानेत भोसकून अत्यंत निर्दयीपणे पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पुन्हा कायदा
सूव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून दोषीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. आरोपी पतीविरोधात खराडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक
केली आहे. ज्योती शिवदास गिते असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment