बापरे..माय लेकीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 23, 2025

बापरे..माय लेकीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल..

बापरे..माय लेकीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल..
बारामती:- माय लेकीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी
बारामतीत एकावर अॅट्रॉसिटी व पोक्सो
कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे  दाखल फिर्यादीवरून दिसून येत आहे,याबाबत मिळालेली माहिती अशी की
 घरात एकट्या असलेल्या आई आणि मुलीला
जातीवाचक शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग
केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात
घडला आहे. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी या आरोपीने दिली होती. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत आनंदकुमार शहा (रा. जुना मोरगाव रोड,
बारामती) असं या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला ही आपल्या दहा वर्षांच्या मुलीसोबत घरी एकटी होती.त्यावेळी आरोपी अभिजीत शहा याने घरात जाऊन या दोघींना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दोघींच्या अंगाशी झटापट केली. याबद्दल पोलिसात
तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही या
आरोपीने दिली.या प्रकरणी संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून अभिजीत शहा याच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, विनयभंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी असं अभिजीत आनंदकूमार शहा (रा. जुना मोरगाव रोड, बारामती) याच्यावर  गुन्हा दाखल झाले आहे. दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला ही आपल्या दहा वर्षांच्या मुलीसोबत घरी एकटी होती.त्यावेळी आरोपी अभिजीत शहा याने घरात जाऊन या दोघींना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दोघींच्या अंगाशी झटापट केली. याबद्दल पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही या आरोपीने दिली.या प्रकरणी संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून अभिजीत शहा याच्यावर  बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, विनयभंग आणि आणि जीवे मारण्याची
धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment