पत्रकारांनी दोष दाखवताना, नकारात्मक परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी: जिल्हाधिकारी अविनाश पाठक. *बीडमध्ये दर्पण पुरस्काराचे वितरण* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 22, 2025

पत्रकारांनी दोष दाखवताना, नकारात्मक परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी: जिल्हाधिकारी अविनाश पाठक. *बीडमध्ये दर्पण पुरस्काराचे वितरण*

पत्रकारांनी दोष दाखवताना, नकारात्मक परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी: जिल्हाधिकारी अविनाश पाठक.
*बीडमध्ये दर्पण पुरस्काराचे वितरण*
बीड(प्रतिनिधी):-पत्रकारीता हा समाजाला दिशा देणारा महत्वाचा घटक आहे. अलीकडच्या काळात माध्यमांची व्याप्ती वाढलेली असली तरी मुद्रीत प्रसार माध्यमांचे महत्व कायम आहे. या क्षेत्रात लिखान करणार्‍या  व्यक्तींनी मराठी भाषेचा महिमा वाढवण्याचे काम करावे.तर समाजातील दोष दाखवताना, त्यामधून नकारात्मक परिणाम होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले. 
      बीड येथे 20 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शाखेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त जिल्ह्यातील 11 पत्रकारांना तसेच एका वृत्तपत्र विक्रेत्यांना यावर्षीचा दर्पण पुरस्कार देण्यात आला.यामध्ये बीड -गंगाधर काळकुटे (सूर्योदय ), परळी -संजय खाकरे (लोकमत),माजलगाव- उमेश मोगरेकर (झुंजार नेता ),वडवणी -जानकीराम उजगरे ( दिव्य मराठी ),धारूर -सय्यद शाकेर (प्रजापत्र ),अंबाजोगाई -अ.र.पटेल (मराठवाडा दर्पण ),आष्टी -अनिरुद्ध धर्माधिकारी (सकाळ ),पाटोदा -संजय सानप (लोकाशा ),शिरूर -अशोक भांडेकर (पार्श्‍वभूमी ),गेवराई -काझी अमान (लोकप्रभा ),केज -अमोल जाधव (कार्यारंभ ),वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार - अर्जुन बेद्रे यांना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.           कार्यक्रमाला माजी मंत्री बदामराव पंडित, बीड जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक संतोष मानूरकर हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकारीता आणि मराठी भाषा याचे परस्परांशी असलेले नाते उलगडून दाखवले. प्र.के.अत्रेंपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक संपादकांच्या अग्रलेखांनी मराठी भाषेला समृध्द केलेले आहे. मुद्रीत माध्यमांपासून पत्रकारीतेला सुरुवात झालेली आहे. जुन्या काळात व्याकरणाच्या चुका होवू नयेत यासाठी गांभिर्यपुर्वक काळजी घेतली जात असायची. त्यातूनच संपादकांच्या डुलक्या, मुद्रीत राक्षसांचा प्रताप असे विनोदी विषय सुध्दा जन्माला आले. अर्थात मराठी वृत्तपत्र त्या काळी तेव्हढ्याच आत्मीयतेने वाचले जात असायचे. पाक्षीक,साप्ताहिक,मासिक स्वरुपातील माध्यमांनी सुध्दा आपले अस्तित्व निर्माण केले होते. आज माध्यमांचे स्वरुप प्रचंड वेगाने बदलत आहे. तरी सुध्दा मुद्रीत माध्यमांचे महत्व कमी झालेले नाही. येणार्‍या काळात हे महत्व टिकवून ठेवणे एक आव्हान असेल. त्यासाठी या क्षेत्रात पत्रकारीता करणार्‍या मंडळींनी अधिकाधिक सज्ज आणि सतर्क राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे जिल्हाधिकार्‍यांनी विशेष अभिनंदन केले. 
             महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारीतेचा इतिहास आपल्या भाषणातून मांडला. बीड जिल्ह्यातील पत्रकार हे केवळ बातमीदारीच करत नाहीत तर प्रत्यक्ष कृतीमधून सामाजिक सुधारणा करण्यासाठी आपले योगदान  देत आहेत. वर्तमानपत्रांचे विक्रीमुल्य आणि त्या मधून होणारा आर्थिक तोटा ही एक जटिल समस्या असल्याचे ते म्हणाले. अनेक आव्हाने स्विकारुन सुध्दा पत्रकारीता आपल्या पायावर भक्कम उभी आहे.त्यासाठी पत्रकारांसोबतच वृत्तपत्र विक्रेते यांचेही मोठे योगदान असल्याचे  मुंडेंनी सांगितले.            कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मानूरकर यांनी केले तर सुत्रसंचालन विजयकुमार गिरे यांनी केले.

No comments:

Post a Comment