समाजसेवा कक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या प्रयत्नांना यश!... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 31, 2025

समाजसेवा कक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या प्रयत्नांना यश!...

समाजसेवा कक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या प्रयत्नांना यश!...
जळगाव:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय जळगाव येथे 108 AMBULANCE च्या माध्यमातून एक  रूग्ण दि. १७/०१/२०२५ रोजी अत्यावस्थेत भरती कारण्यात आला होता.
रुग्ण विचारपूस व प्रक्रियेला कोणताही प्रतिसाद देत नव्हता.  सोबत कोणी परिचीत अथवा नातेवाईक नसल्याने इतर प्रक्रियांना विलंब होत होता. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी समाजसेवा कक्षाची मदत घेतली . समाजसेवा अधिक्षक डॉ तुषार सावरकर यांनी उपलब्ध कागदपत्रे,  अपघातग्रस्त स्थळाला भेट देऊन माहिती मिळवली. त्यानुसार रुग्ण हा मुकेश हा बुरहापूर येथील असल्याचे समजले व नातलागांशी संपर्क साधून रुग्णासोबत जोडण्यात आले.  
 अश्या प्रकारे फक्त औषधोपचारा पलीकडे जाऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण हितासाठी प्रयत्न होत आहेत.
या कामात डॉ गिरीष ठाकूर, अधिष्ठाता, डॉ विजय गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक यांचे मार्गदर्शन, व उपचार करणारे डॉक्टर, अधीपरीचारिका, वॉर्ड सिस्टर यांच्या मदतीने रुग्ण व त्याच्या नातेवाईक यांचा संपर्क होऊ शकला.अशी माहिती डॉ तुषार सावरकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी दिली.

No comments:

Post a Comment