उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित विशेष मोहिमेत १४९ वाहनांची तपासणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 12, 2025

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित विशेष मोहिमेत १४९ वाहनांची तपासणी..

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित विशेष मोहिमेत १४९ वाहनांची तपासणी..
बारामती, दि. 12:- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित विशेष तपासणी मोहीमे वायुवेग पथकामार्फत एकूण १४९ वाहनांची तपासणी करण्यात करुन २७ वाहनांवर कारवाई  करण्यात आली; या दरम्यान एकूण २७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

या कालावधीत बारामती ,दौड  आणि इंदापूर तालुक्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणारे वाहनचालक तसेच नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही वाहने रस्त्यावर वाहने उभी करणे, वाहनांची कागदपत्रे सोबत न ठेवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, भार क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहनातून वाहतूक करणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी वाहतूक विषयक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. निकम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment