कर्करोग तपासणी शिबीरात बारामती तालुक्यात एकूण ३५५ महिलांची तपासणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 12, 2025

कर्करोग तपासणी शिबीरात बारामती तालुक्यात एकूण ३५५ महिलांची तपासणी..

कर्करोग तपासणी शिबीरात बारामती तालुक्यात एकूण ३५५ महिलांची तपासणी..
बारामती:-जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी मोहिमेत तालुक्यात काटेवाडी येथे आयोजित शिबीरात १२, पणदरे ५६, मोरगाव १६५ आणि सुपा येथे १२२ असे एकूण ३५५ महिलांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.

यामध्ये संशयित मुख कर्करोग २४८ स्तन कर्करोग ४० व गर्भाशय मुख कर्करोग ६७ असे एकूण ३५५ संशयित महिलांची तपासणी करण्यात आली आहे व त्यांच्या पुढील तपासणी व निदान झाल्यावर मोफत उपचार शासनामार्फत करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. खोमणे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment