पुणे:- सद्या लाच घेणाऱ्याचे प्रमाण वाढत चालले असून अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात असे प्रकार सर्रास अनुभवयास मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे,भूमी अभिलेख कार्यालयात पालखी मार्ग, रेल्वे मार्ग,रस्तात येत असलेल्या जमिनी याची मोजणी तातडीने व्हावी यासाठी किती टक्के घेतले जातात याची चर्चा चालू असतानाच नुकताच पुणे जिल्ह्यातील भूअभिलेख विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी सध्या अडचणीत आले आहेत.
जमिनीच्या मोजणीसंदर्भात ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांनंतर उप-अधिक्षक पाटील आणि मोजणी अधिक्षक येटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तक्रारदाराने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने लक्ष घातल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार,तक्रारदाराने २०२३ पासून पुणे ग्रामीण मधील एका शेतजमिनीची मोजणी व हद्द निर्धारण प्रक्रियेबाबत सातत्याने अर्ज करूनही अधिकारी टाळाटाळ करत होते.याच दरम्यान, पाटील व येटोळे यांनी कामासाठी ५० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर, "हेलिकॉप्टर शॉट लावतो" अशा प्रकारची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील बहुली भगतवाडी येथील शेतकऱ्याची चुकीच्या मोजणीमुळे शेतजमीन चोरीला गेल्याच्या प्रकरण यास पंधरा दिवसाचा
कालावधी पुर्ण होण्यापूर्वीच उपअधिक्षक पाटील यांच्या कामकाजाची तपासणी सुरू झाली होती. सध्याच्या घडीला देखील पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते आजपर्यंत केलेल्या सर्व कामांची तपासणी करण्यात येत असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment