कु. श्रवण खाडे याची महाराष्ट्र प्रिमिअर लिग मधील रायगड राॅयल्स या संघामध्ये निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 19, 2025

कु. श्रवण खाडे याची महाराष्ट्र प्रिमिअर लिग मधील रायगड राॅयल्स या संघामध्ये निवड..

कु. श्रवण खाडे याची महाराष्ट्र प्रिमिअर लिग मधील रायगड राॅयल्स या संघामध्ये निवड..
बारामती:- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे महाराष्ट्र प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा 2025 चे अयोजन दि. 31/5/2025 पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे - पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होणार असून या स्पर्धेमधील रायगड राॅयल्स या संघामध्ये कु. श्रवण खाडे याची निवड करण्यात आली आहे. 
क्रिकेटची आवड, कौशल्य व सातत्यपुर्ण व तांत्रिक प्रशिक्षणाच्या जोरावर अथक परिश्रम करून आजवर यशस्वी झालेल्या कु. श्रवण खाडे याने महाराष्ट्र राज्याच्या U-16 या वयोगटातील संघामध्ये स्थान मिळवत ‘‘ओपनिंग लेफ्ट आर्म पेस बाॅलर’’ म्हणून आपले कौशल्य दाखवत देशातील भल्या-भल्यांच्या दांड्या गुल केल्या होत्या. तसेच भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती येथे नुकत्याच झालेल्या कारभारी प्रिमिअर लिग (KPL) या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनेक रणजी क्रिकेट खेळाडूंना आपल्या गोलंदाजीवर धूळ चारून त्याचवेळीच निवड समितीचे लक्ष वेधले होते. 
कु. श्रवण खाडे मुळचा झाशी-पळशी, ता. माण, जि. सातारा येथील अतिदुर्गम अशा ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील खेळाडू असून तो सध्या सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन मधून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या  U-16 / U-19 आमंत्रित साखळी सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व करीत असून सरावा करीता बारामती येथील तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे कारभारी जिमखाना या निवासी क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामध्ये श्री. सचिन माने (मुख्य प्रशिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत (नाना) सातव यांच्या संकल्पनेतून K.A.C.F. English Medium School म्हसोबानगर, माळेगांव रोड, ता. बारामती, जि. पुणे येथे भारलेले निवासी ‘‘स्कुल आॅफ क्रिकेट’’ च्या माध्यमातून दिवस व रात्र मिळून 8 तास कठोर परिश्रम करून क्रिकेटचे धडे घेत आहे.
तसेच कु. श्रवण खाडे यास सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व प्रशिक्षक तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यतत्पर सचिव अॅड. श्री. कमलेश पिसाळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
कु. श्रवण खाडे याने सर्व ग्रामीण भागातील मुला-मुलींना कठोर परिश्रम, प्रशिक्षणाच्या जोरावर खडतर व बिकट परिस्थीतीवर मात कशी करायची ? याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून सिद्ध करून दाखविले आहे. 
सध्या कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन बारामती या संस्थेकडे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती हे देखभाल व दुरूस्तीसाठी महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी जबाबदारी सोपवली असून त्यांचे तसेच मा.श्री. किशोर भापकर साहेब (बिझनेस हेड-ISMT) यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन कु. श्रवण खाडे व बारामतीतील क्रिकेट खेळाडूंना लाभत आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून कु. श्रवण खाडे यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचे योग्य प्रदर्शन दाखविण्याची संधी प्राप्त होणार असून कु. श्रवण खाडे याच्या या यशामध्ये त्याची आई, वडिल -श्री. नवनाथ खाडे, आजी-आजोबा, बहिण तसेच सर्व झाशी-पळशी ग्रामस्थ व स्थानिक क्रिकेट खेळाडू यांचा मोलाचा वाटा आहे. या निवडीमुळे झाशी-पळशी, माण तालुका, फलटण तालुका, सातारा जिल्हा व बारामती परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. 

*‘स्कुल आॅफ क्रिकेट’ या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या अधिक माहितीसाठी संपर्क -*
श्री. प्रशांत (नाना) सातव - 9604224242
श्री. सचिन माने सर -  9637571712

No comments:

Post a Comment