रेश्मा जाधव - गायकवाड यांची महसूल सहायक पदी निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 19, 2025

रेश्मा जाधव - गायकवाड यांची महसूल सहायक पदी निवड..

रेश्मा जाधव - गायकवाड यांची महसूल सहायक पदी निवड..
बारामती:-बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रेश्मा हितेश जाधव- गायकवाड यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून महसूल सहायक मुंबई या पदावर शिक्कामोर्तब केले आहे. तरुण वयात पतीचे निधन झाल्यानंतर व पाठीमागे एक लहान मुलगा असताना न डगमगता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी मागच्या वर्षी कालवा निरीक्षक या पदावर यश मिळविले होते. या वर्षी दुसऱ्यांदा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे. छोट्या-छोट्या अपयशातून नाराज होऊन अनेक जण खचून जातात, प्रसंगी आत्महत्याही करतात. अशा तरुण-तरुणींसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरणार आहे. कालवा निरीक्षक म्हणून काम करीत असताना साखरवाडी ते वडगाव निंबाळकर प्रवास करून, लहान मुलाचा सांभाळ करीत त्यांनी हे यश मिळवले असल्याने
परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.तसेच बारामती टकारी समाजाच्या वतीने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment