अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना दम,माझा पदाधिकारी स्वच्छ अन निर्व्यसनी असला पाहिजे, दोन नंबरवाला असला की टायरमध्ये गेलाच समजा.... - vadgrasta

Post Top Ad

Saturday, April 26, 2025

अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना दम,माझा पदाधिकारी स्वच्छ अन निर्व्यसनी असला पाहिजे, दोन नंबरवाला असला की टायरमध्ये गेलाच समजा....

अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना दम,माझा पदाधिकारी स्वच्छ अन निर्व्यसनी असला पाहिजे, दोन नंबरवाला असला की टायरमध्ये गेलाच समजा....
परभणी:- राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात
अजितदादांनी  वक्तव्य केलं या वेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या
वागण्या-बोलण्यावरुन त्यांना नेहमीच सूचना
देणाऱ्या अजितदादांनी आताही पदाधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतल्याचं दिसतंय. माझा पदाधिकारी हा स्वच्छ आणि निर्व्यसनी असायला हवा, दोन नंबरवाला असेल तर तो टायरमध्ये गेलाच समजा असा सज्जड दम अजितदादांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.परभणीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात अजितदादांनी हे वक्तव्य केलं. यावेळी अजित पवारांच्या उपस्थितीत 400 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला.राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार शनिवारी परभणी दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रशासनाच्या बैठका
घेतल्यानंतर शहरातील अक्षता मंगल कार्यामध्ये
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या  मेळाव्यामध्ये विविध पक्षांच्या जवळपास 400
पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.यावेळी बोलताना अजितदादांनी पक्षाचा पदाधिकारी हा स्वच्छ व निर्व्यसनी असला पाहिजे असं म्हटलं. जर दोन नंबरवाला असेल तर त्याला मी सोडणार नाही, मग तो टायरमध्ये गेलाच म्हणून समजा असा दम भरला.

No comments:

Post a Comment