पुणे जिल्ह्यातील या पोलीस ठाण्यातील हद्दीत जुगाराच्या अड्ड्यावर खेळला जातोय जुगार...
पुणे:- पुणे जिल्ह्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात तसेच सासवड, जेजुरी व लगतच्या तालुक्यातील गावात जुगाराचे अड्डे व बिंगो-चक्री चालू असल्याचे अनेक बातम्या प्रसिद्ध होत असल्याचे दिसत आहे, पोलीस अधीक्षक(पुणे जिल्हा ग्रामीण)पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असले, तरी या आदेशाला काही भागात हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. पोलीस ठाण्यातील अधिकारी याकडे लक्ष देतील का असा सवाल नागरिक करताना दिसत आहे,कोण्याच्या आशीर्वादामुळे अश्या परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत
म्हणून नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र,अवैध धंदे काही बंद झाले नाहीत. कारण हे अवैध धंदे शुभआशीर्वादाने बिनधास्तपणे सुरु आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment